शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ७० टक्के मदतीचे वाटप पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतीवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या २० हजार शेतकर्यांना शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतीवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या २० हजार शेतकर्यांना शासनाने जाहिर केलेली मदत वाटप करण्यात नंदुरबार जिल्हा प्रशासन नाशिक विभागात पुढे आहे. आतापर्यंत तब्बल ६९ टक्के मदतीचे वाटप पूर्ण करण्यात आली आहे.      गेल्या वर्षी अतीवृष्टीमुळे कोरड व बागायत क्षेत्रातील १० हजार शेतकर्यांच्या शेती उत्पादनांचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंचनामे करुन ३३ कोटी १३ लाख २३ हजार रूपयांच्या रकमेची मागणी केली होती. या मागणीनुसार शासनाने गेल्या महिन्यात जिल्ह्यासाठी १६ कोटी ५६ लाख ६१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर करुन वितरण केले होते. या मदतीचे वितरण सध्या तालुकास्तरावर सुरू आहे. यांतर्गत आतापर्यंत ८ हजार शेतकर्यांना ११ कोटी रूपयांची मदत देण्यात आली असून उर्वरित शेतकर्यांना येत्या आठ दिवसात पैसे देण्यात येणार आहे. दरम्यान येत्या २९  सप्टेंबरपूर्वी जिल्ह्याला मंजूर असलेला दुसर्या टप्प्यातील निधी देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रक्कम वितरणात नंदुरबार जिल्हा नाशिक विभागात पुढे असताना धडगाव आणि तळोदा तालुका प्रशासनाने प्रथम क्रमांक पटकावला  आहे. धडगाव तालुक्यातील १ हजार १०१ शेतकऱ्यांना २० दिवसात ५४ लाख २८ हजार रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले. तर तळोदा तालुक्यातील दोन हजार ६६१ शेतकर्यांना दोन कोटी ७६ लाख ११ हजार ९२५ रुपयांच्या मदतनिधीचे वितरण केले आहे. दोन्ही तालुके नेट कनेक्टीव्हीटी व बँकामधील समस्यांसाठी ओळखली जाते. असे असतानाही दोन्ही तालुक्यांनी १०० टक्के मदत वाटप करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच नंदुरबार तालुक्यात २ हजार ४१५ शेतकरी, शहादा १ हजार २७५ तर अक्कलकुवा तालुक्यात १ हजार १०१ शेतकऱ्यांना मदत मिळाली असल्याची माहिती आहे.  

प्रशासनाने नंदुरबार तालुक्यासाठी ४ कोटी ६९ लाख ३३ हजार ५००, नवापूर ५३ लाख ७१ हजार ५००, शहादा ६ कोटी ९९ लाख ५२ हजार ५००, तळोदा २ कोटी ७६ लाख १२ हजार, अक्कलकुवा १ कोटी ३६ लाख ६४ हजार तर धडगाव तालुक्यासाठील ५४ लाख २८ हजार रूपयांच्या निधीचे वितरण केले होते. तहसील कार्यालयांकडे वर्ग करण्यात आलेली ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यांवर वितरीत करण्याचे काम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले होते. यांतर्गत आजअखेरीस ८ हजार १९९ शेतकर्यांना ११ कोटी ४७ लाख ९९ हजार ८७७ रूपयांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहेत. यात नंदुरबार ३ कोटी १५ लाख ६१ हजार २०४, नवापूर ३ लाख ३५ हजार ५८०, शहादा ४ कोटी २९ लाख २७ हजार ५७६ तर अक्कलकुवा तालुक्यात ६९ लाख ३५ हजार ५९२ रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. 

बँकांमध्ये होवू लागली गर्दीजिल्हा प्रशासनाने बागायत आणि कोरड अशी वर्गवारी करत निधीचे वितरण केले आहे. परंतु यात नवापूर तालुक्याची पिछेहाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील २८७ कोरडवाहू नुकसान झालेल्या शेतकर्यांना ३ लाख ३५ हजार ५८० रूपयांची मदत दिली गेली आहे. तर एकाही बागायतदार शेतकर्याला मदत मिळालेली नसल्याची माहिती आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार ३९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेल्या कोरड व २ हजार २८० हेक्टर क्षेत्रातील बागायतदार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांवर टाकण्यात आलेली ही रक्कम त्यांना प्राप्त झाल्यानंतर काढण्यासाठी गर्दी होत आहे.