शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

कोरोना चाचण्या आणि मोक्कावर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या दैनंदिन किमान ५०० चाचण्या कराव्या, आॅक्सीजन बेडची संख्या वाढवावी तसेच स्थलांतरीत मजुरांना रोखण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या दैनंदिन किमान ५०० चाचण्या कराव्या, आॅक्सीजन बेडची संख्या वाढवावी तसेच स्थलांतरीत मजुरांना रोखण्यासाठी स्थानिक स्तरावरच कामे उपलब्ध करून द्यावी अशा सुचना विभागीय महसूल आयुक्तांनी दिल्या होत्या. त्या सुचनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. दरम्यान, विशेष पोलीस महानिरिक्षकांनीही गुटखा, वाळू वाहतूक आणि रस्ता लुटमारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या दिलेल्या सुचनांची पोलीस दलातर्फे लवकरच अंमलबजावणी केली जाण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.गेल्या आठवड्यात तीन दिवसांच्या अंतराने नव्यानेच रुजू झालेले विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे व विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी जिल्ह्यात भेटी दिल्या होत्या. त्यांच्या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट झाले होते. दौरा यशस्वी करण्यासाठी दोन्ही विभागांनी कंबर कसली होती. दोन्ही अधिकाऱ्यांचा दौरा यशस्वी झाला देखील. त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्यासाठी मात्र आता दोन्ही विभागांची कसरत सुरू आहे.५०० कोरोना चाचण्यांसाठी...विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या दौºयात कोविडची स्थिती आणि एकुण उचारासंदर्भातील नियोजन याची माहिती जाणून घेतली. कोविड उपचार कक्षाला देखील त्यांनी थेट भेटी देऊन तेथे दाखल रुग्णांशी त्यांनी चर्चा केली व सेवा, सुविधांविषयी त्यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी त्यांना आढळून आलेल्या काही त्रुटींबाबत त्यांनी सुचना केल्या. याशिवाय दररोज किमान ५०० कोरोना चाचण्या झाल्या पाहिजे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने नियोजन केले असले तरी सद्या तरी ३०० च्या वर कोरोना चाचण्या जात नसल्याची स्थिती आहे. अर्थात तेवढे स्वॅब संकलन होत नसल्याची स्थिती आहे. शिवाय येथील आरटीपीसीआर लॅब मध्ये दररोज केवळ तीनच शिफ्ट होतील एवढीच कर्मचारी संख्या आहे. त्यामुळे ५०० चाचण्यांचे टार्गेट होणे तारेवरची कसरतच ठरणार आहे.नवीन कोविड कक्ष सुरू करण्यासाठी तळोदा आणि नवापूर येथे प्रयत्न राहणार आहे. याशिवाय आॅक्सीजन बेडची संख्या देखील वाढविण्यात भर देण्याच्या सुचना त्यांनी केल्या होत्या. नंदुरबारात स्थानिक ठिकाणी आॅक्सिजन प्लॉन्ट सुरू होईल तेव्हाच बेडचीही संख्या वाढण्याची शक्यता आहे.याशिवाय पाणंद व शिवार रस्त्यांच्या कामाबाबत आवश्यक अ‍ॅप तयार करण्यात यावे अशा सुचना देखील त्यांनी दिल्या होत्या. त्या दृष्टीने अद्याप काही हालचाली नसल्याचे चित्र आहे. राजस्व अभियानात नव्याने काही करण्यासारखे नसल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले होते.गुटखा तस्करीवर लक्ष केंद्रीतविशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी आंतरराज्य सिमेवरून होणारी गुटखा तस्करीवर विशेष फोकस केला होता. या तस्करीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी सुचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने पोलीस विभागाने नियोजन केले आहे. परंतु गुटखा तस्करही आता सावध झाले आहे. नव्याचे नऊ दिवस म्हणून काही दिवस गुटखा तस्करी बंद ठेवण्यावर तस्करांचा भर राहणार आहे. त्यामुळे धानोरा येथील कारवाई वगळता दुसरी कारवाई झालेल नाही.जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा व नंदुरबार तालुक्यात रस्ता लुटीच्या घटना गेल्या काळात वाढल्या होत्या. अशा घटनांना पायबंद घालता यावा यासाठी अशा गुन्हेगारांवर थेट मोक्का लावण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. त्यानुसार रस्ता लुटीच्या गुन्ह्यातील आरोपींवरील आरोप सिद्ध व्हावे यासाठी आता पोलिसांनाही त्या केसेस अधीक स्ट्राँग कराव्या लागणार आहेत. गुटखा, वाळू तस्करीच्या माध्यमातूनच रस्ता लुटीतील काही डॉन तयार झाले होते. त्यांच्यावर आता बºयापैकी वचक असला तरी न्यायालयातील त्यांच्या केसेस अधीक स्ट्राँग लावून धरणेही आवश्यक आहे.४ई-फेरफार, महाराजस्व अभियान, आधार प्रमाणिकरण, आधार नोंदणी, पी.एम.किसान योजना, पीककर्ज वाटप, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना, कापूस खरेदी यासह मनरेगा अंतर्गत अधिकाधिक कामे घेण्यात यावीत. सिंचन विहीरीची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. मंजूर असलेले घरकुलाची कामे सुरु होण्याच्या दृष्टीने नियोजन. पाणंद व शिवार रस्त्यांच्या कामाबाबत आवश्यक अ‍ॅप तयार करण्यात यावे. ‘विकेल ते पिकेल’ योजनेचा अधिकाधिक प्रसार करावा या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील आहे.४गुन्हेगारी दत्तक योजनेसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरिक्षकांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने ते वैयक्तिक या योजनेचा फॉलोअप घेणार आहेत. जिल्ह्यातील ज्या महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गांवर वारंवार अपघात होतात. त्या रस्त्याचे रोड ट्राफिक आॅडीट केले जाणार आहे. त्यादृष्टीने देखील वारंवार अपघात होणाºया जागांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.