शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

चांदसैली घाटमार्ग खचल्याने अपघाती धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:56 IST

चांदसैली घाट : रिपरिप पावसामुळे समस्या, जीव मुठीत घेऊन होतोय प्रवास

कोठार :  कोठार ते धडगाव दरम्यानचा चांदसैली घाटरस्ता ठिकठिकाणी खचल्याने जीवघेणा ठरत आहे.त्यामुळे प्रवाशांना घाटातील प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागत असल्याचे चित्र आहे.सातपुडा पर्वत रांगेतील धोकेदायक असणा:या घाटांपैकी चांदसैलीचा घाट ओळखला जातो. धडगाव तालुक्याला जिल्हा मुख्यालयाला कमी वेळात तसेच कमी अंतराच्या रस्त्याने जोडण्यासाठी चांदसैली घाट महत्वाचा व मोक्याचा आहे. इंधन, वेळ व श्रमाची बचत व्हावी म्हणून वाहनधारक धडगाव येथे जाण्यासाठी चांदसैली घाटाचा अवलंब करतात, त्यामुळे दिवसभर या घाटात वाहनांची मोठय़ा संख्येने वर्दळ असते.धडगाव तालुक्यातील जनतेसाठी महत्वपूर्ण असणा:या या चांदसैली घाटातील रस्त्याची मोठी वाताहत झाली आहे. कोठारपासून पुढे धडगावकडे जाणारा रस्ता पावसाच्या रिपरिपमुळे  ठिकठिकाणी खचलेला दिसून येत आहे. सातपायरी घाटाच्या पायथ्याशी असणा:या नागमोडी वळणावरील रस्ता मोठय़ा प्रमाणात खचला आहे. रस्ता खचल्यामुळे संरक्षक कठडय़ांची दुरावस्था झाली आहे. दुरावस्था झालेल्या संरक्षक कठडय़ांची दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाकडून करण्यात आली होती़ मात्र पावसाची रिपरिप व दिवसभर शेकडो वाहनाची वर्दळ यामुळे या ठिकाणचा रस्ता दिवसेंदिवस अधिकच खचत जात आहे. मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याची स्थिती आहे. साधारणत: या ठिकाणचा रस्ता खचायला मे महिन्यात सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्ता खचण्याच्या प्रकारावर उपाययोजना करणे प्रशासनाला शक्य होत़े मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अशीच स्थिती चांदसैली गाव येण्यापूर्वीच्या उताराच्या रस्त्यालगतची आहे. वळण व रस्त्यालगतची झाडे-झुडपे यामुळे या ठिकाणचा खचलेला रस्ता वाहनधारकांना सहसा लक्षात येत नाही.या परिस्थितीमुळे चांदसैली घाटातील वाट अधिक बिकट बनली आहे. त्यामुळे घाटातील प्रवासात प्रवाश्यांचा जीव टांगणीलाच असतो. तीव्र चढ-उतार, जीवघेणी वळणे, खोल द:या, यामुळे चांदसैली घाट हा निसर्गत:च धोकादायक आहे. त्यात संरक्षक कठडय़ांची दुरावस्था, खचलेला रस्ता यामुळे  घाटातील प्रवास अधिकच धोकेदायक बनतो. त्यामुळे प्रशासनाने घाटातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे कानाडोळा न करता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.