नंदुरबार : जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता समारोपाकडे वाटचाल करू लागला आहे. साधारणत: मार्च अखेरपर्यंत गाळप संपण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सव्वातीन महिन्यात तिन्ही साखर कारखान्यांनी नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी दिवाळीच्या वेळी गाळप हंगामाला सुरुवात केली होती. गेल्या सव्वातीन महिन्यात या कारखान्यांनी पुर्ण क्षमतेने ऊस गाळप केला. यंदा अपेक्षीत ऊस उत्पादन असल्यामुळे ऊस पळवापळवी फारशी झाली नाही. त्यामुळे तिन्ही साखर कारखान्यांनी अपेक्षीत ऊस गाळप केले आहे. सर्वाधिक गाळप आयन शुगर या खाजगी साखर कारखान्याने केले आहे. त्या खालोखाल सातपुडा साखर कारखान्याने गाळप केले आहे.दहा लाखाच्या घरातयंदा तिन्ही साखर कारखान्यांनी सरासरी ११० दिवस गाळप केले आहे. एकुण नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादीत झाली आहे. सातपुडा साखर कारखान्याने १०७ दिवसात तीन लाख ४८ हजार ८८० मे.टन ऊस गाळप केले आहे. त्यातून तीन लाख ५१ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. सरासरी साखर उतारा १०.१७ इतका मिळाला आहे.आयन शुगर या कारखान्याने १११ दिवस गाळप हंगाम घेतला आहे. चार लाख १६ हजार ५७० मे.टन ऊस गाळप करून चार लाख ३७ हजार २८६ क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. या कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.५६ इतका मिळाला आहे.आदिवासी साखर कारखान्याने ११३ दिवस गाळप हंगाम घेतला आहे. कारखान्याने एक लाख ४५ हजार ३४ मे.टन ऊस गाळप करून एक लाख ४३ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.५ इतका मिळाला आहे.तिन्ही कारखान्यांनी आतापर्यंत एकुण नऊ लाख दहा हजार ४८४ मे.टन. ऊस गाळप केला असून त्यातून नऊ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उत्पादन बरोबरीत आहे. त्यामुळे यंदा तिन्ही साखर कारखाने मिळून एकुण ११ लाखापर्यंत साखर उत्पादन घेणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. साधारणत: दोन लाख मे.टन ऊस अद्यापही गाळपाचा शिल्लक आहे. त्याला २० ते २५ दिवस लागण्याची शक्यता आहे.भावही समाधानकारकतिन्ही साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे भाव जाहीर केलेला आहे. आधी घोषीत केल्याप्रमाणे हप्त्याची रक्कमही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या काळात ऊस दरावरून वातावरण काहीसे गढूळ झाले होते. परंतु समन्वयातून तोडगा निघाल्याने हंगाम सुरळीत सुरू राहिला आहे.खान्देशात सर्वाधिकसाखर हंगाम घेणाºया साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक अर्थात तीन कारखाने एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत.यंदा खान्देशातून चार कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. त्यात नंदुरबारातील दोन सहकारी तर एक खाजगी तत्वावरील साखर कारखाना तर जळगाव जिल्ह्यातून केवळ मधुकर सहकारी साखर कारखान्याने यंदाचा गाळप हंगाम घेतला आहे. त्यामुळे ऊसाची पळवापळवी फारशी झाली नसल्याची स्थिती आहे.
९ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:01 IST