लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरालगतच्या पातोंडा शिवारातील मेघमल्हार सिटीतील घरात ठेवलेला कापूस अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी सकाळी घरामालकाच्या हा प्रकार लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे.मेघमल्हार सिटीतील गिरीष दिक्षित यांच्या घरात १२.५ क्विंटल कापूस ठेवला होता. बाजारभावानुसार या कापसाची किंमत ही ६१ हजार २५० रूपये एवढी होती. दरम्यान हा कापूस अज्ञात चोरट्यांनी २ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चोरुन नेला. ही घटना समजून आल्यानंतर नागरीकांनी पोलीसांना माहिती दिली होती. याप्रकरणी महेंद्र ताराचंद शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील करत आहेत.
मेघमल्हार सिटीतून ६१ हजाराचा कापूस लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 22:06 IST