शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

जिल्ह्याच्या आरोग्याची झाडाझडती घेण्यासाठी २८ अधिकारी दाैर्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या साथीनंतर जिल्ह्यातील रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करुन जनतेस येणार्या अडचणींचा आढावा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या साथीनंतर जिल्ह्यातील रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करुन जनतेस येणार्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागातील संचालक दर्जाचे २८ वरीष्ठ अधिकारी जिल्हा दाैर्यावर आले आहेत. मंगळवारी दाैर्याच्या पहिल्या दिवशी आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परीषदेत जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकार्यांची बैठक झाली. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व  प्राथमिक आरोग्य  केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान वैयक्तिक लाभाच्या योजनांसह कुपोषण व आरोग्य योजनांची माहिती घेत  अधिकार्यांना सूचना करण्यात आल्या. दरम्यान बुधवारी सकाळी प्रत्येकी तीन अधिकार्यांचे पथक सर्व सहा तालुक्यात रवाना होणार आहे. याठिकाणी त्यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देत माहिती घेतली जाणार आहे. तसेच वित्त व लेखा विभागाचे संचालक नंंदुरबार मुख्यालयी थांबून आरोग्य विभागाने केलेल्या खर्चाचा लेखाजोखा घेणार असल्याची मााहिती देण्यात आली आहे. एकाचवेळी जिल्ह्यात संचालक दर्जाचे एवढे अधिकारी आल्याने प्रशासनाचे भंबेरी उडाल्याचे दिसून आले.  

संचालकांच्या दाैर्यामुळे आरोग्य केंद्र झाडून पुसून तयार 

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरोग्य संचालनालयाच्या अधिकार्यांच्या दाैर्याच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागासह सर्व सहा तालुक्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्र, १३ ग्रामीण रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालये झाडून पुसून स्वच्छ करण्यात आली आहेत. बुधवारी पहिले पथक धडगाव तालुक्याकडे रवाना होणार आहे. धडगाव, अक्कलकुवा या दोन तालुक्यात सहा संचालक व युनिसेफचे दोन अधिकारी अशी दोन स्वतंत्रे पथके निर्माण केली गेली आहेत. ३० रोजी दाैरा पूर्ण होण्यापूर्वी जिल्हा परीषदेत आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांची उपस्थिती राहणार आहेत. त्यांच्यासमोर समितीने केलेल्या दाैर्यातील निरीक्षणे मांडली जाणार आहेत. या दाैर्यातून आंकांक्षित नंदुरबार जिल्ह्यासाठी आरोग्य अंतर्गत स्वतंत्र निधीची योजना अंमलात येण्याची शक्यता आहे.