पाच हजार लोकसंख्या वस्तीच्या बिलोली तालुक्यातील कासराळीत अधिकृत परवानाधारक दुकान आहे. येथे कार्यालयीन वेळेत दुकान बंद-चालू होत असले तरी या परिसरात सकाळी दहापूर्वी हमखास दारू मिळते. बसस्थानकाच्या जवळ ही विक्री मूळ किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होते. थोडक्यात येथे २४ तास दारू उपलब्ध होते; पण कार्यालय वेळेव्यातिरिक्त जरा अधिक पैसे मोजावे लागतात. ३० ते ४० वयोगटातील अनेक युवक या दारूच्या व्यसनात आकंठ बुडालेले आहेत. त्यामुळे येथे अवैध विकणा-या दारू विक्रेत्यांना महत्त्व आले. येथे दारूची सवय लागलेले युवक दुकान उघडण्यापूर्वी विक्रेत्यांकडे सकाळी पोहोचतात. चहासाठी हाॕॅटेलमध्ये कमी; पण दारू विक्रेत्यांकडे जास्त मद्यपींची गर्दी या परिसरात दिसते. या गंभीर बाबीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. वेळीच हा अवैध प्रकार थांबववा, अशी मागणी महिला व स्वयंसेवी संस्थेमार्फत केला जात आहे.
कासराळीत मद्यपींची दारू नामाने होतेय सकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST