शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सुविधांपासून कोसोदूर

By admin | Updated: November 6, 2014 13:43 IST

शहरापासून ३-४ कि.मी. अंतरावर असलेला व नगर परिषदेअंतर्गत येणारा हुलकानेतांडा स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

 हदगाव : शहरापासून ३-४ कि.मी. अंतरावर असलेला व नगर परिषदेअंतर्गत येणारा हुलकानेतांडा स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावाला साधा रस्ताही नसल्यामुळे येथील नागरिकांना आपण शहरालगत राहत नसून एखाद्या जंगलात राहत असल्याचाच अनुभव येतो.५0 ते ६0 घरे असलेला हा तांडा शहरालगतच आहे. हदगावच्या मोठमोठय़ा हस्तीचे शिवार येथे आहे. हुलकाने यांच्या शेतात सालगडी म्हणून राहत असणारे पूर्वीचे बंजारी यांचे एकच घर होते. हळूहळू येथे वस्ती वाढली. आजूबाजूला जंगल असल्यामुळे जंगलातील शिकार करुन आपली व कुटुंबाची उपजीविका भागविणारे बंजारी येथील शेतकर्‍यांच्या संपर्कात आले व त्यांनी शेती कसायला सरुवात केली.देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटले परंतु या तांड्याच्या मूलभूत सुविधा अपूर्णच आहेत. येथे शासनाची फक्त जि.प. शाळा आहे. बाकी कोणत्याच सुविधा नाहीत. प्रत्येक गावाच्या शेजारी तांडा असतो. तो त्या गावाच्या ग्रामपंचायतीस जोडला गेला व त्याचा विकासही झाला. गावात नळयोजना, वीज, आरोग्य, शिक्षण या सुविधा आल्या परंतु येथे मात्र कोणतीच सोय नाही. येथे नेहमीच गुडघ्याएवढे उंचीचे गवत असते व परिसर निर्जन्य असल्यामुळे साप, विंचू यांचेही प्रमाण भरपूर असते. बाहेरगावी पाहुण्यांकडे गेल्याने आमचे गाव हदगाव म्हणून सांगणार्‍या या ग्रामस्थांना शहरातील कोणतीच सुविधा मिळत नाही. शहराचा होणारा विकास पाहून यांचाही ऊर भरुन येतो. दिवसभर येथील ग्रामस्थ मोठय़ा दिमाखाने शहरात फिरतात व रात्री गावाकडे जाताना मात्र त्यांना रस्त्याचा होणारा त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नाही. तांड्यावरील एखादा नाईक एका पार्टीचे वाजवितो तर दुसरा नाईक दुसर्‍या पार्टीचे वाजवितो. एकमेकाच्या जिवावर उठतात, परंतु विकासासाठी एकत्र येऊन मागणी करीत नाही. त्यामुळे प्रतिनिधीचे फावते. निवडणुकीवेळी दारु-मटनच्या ओल्या पाटर्य़ाही होतात. निवडणूक संपली की, रस्त्याच्या चर्चाही संपतात. आता तरी नवीन आमदार याकडे लक्ष घालतील का? अशी चर्चा रंगत आहे./ ■ येथे बाकी सुविधांची आवश्यकता नाही. फक्त दळणवळाची सोय झाली तरी हदगाव शहरातील सर्वच सुविधांचा त्यांना फायदा घेता येईल. परंतु शेतीकडे जाण्यासाठी पाणंदरस्ता चांगला असतो परंतु या तांड्याकडे जाण्यासाठी तसाही रस्ता उपलब्ध नाही. हा रस्ता करुन देतो म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्यांना शब्द दिला खरा परंतु पाळला कोणीही नाही. पावसाळा व हिवाळ्यात ही मंडळी पायी चालण्यासाठी अंतर कमी व्हावे यासाठी सिंचन विभागाच्या कार्यालयातून ये-जा करतात.