मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका बैठकीत जि.प. शाळांची थकीत देयके ऊर्जा विभागाच्या सचिवासोबत चर्चा करुन एक रक्कमी भरण्याचे निर्देश दिले. त्यानुसार २०२०-२०२१ या वर्षाकरिता सादिल अनुदानातून राज्यातील १० हजार ६७१ जिल्हा परिषदेच्या शाळांचे ५ कोटी ८८ लाख ६३ हजार रुपयांचे थकीत वीज बिल महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीस अदा करण्यास मान्यता दिली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील ३६७ जि.प. शाळांकडील थकीत वीज बिलापोटी २१ लाख ५६ हजार रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. सदर रक्कम अदा करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक यांना आहरण व सवितरण तर आयुक्त (शिक्षण) यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
३६७ जि.प. शाळांच्या थकीत वीज देयकांसाठी २१ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST