मुखेड तालुक्यातील १२८ ग्रामपंचायती असून तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
झाल्या असून यातील जांब, बु. पाखंडेवाडी ही संयुक्त ग्रामपंचायत विभक्त झाल्यामुळे याची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली; पण तो दिवस निरंक राहिला तर २५ डिसेंबर हा दुसरा दिवस. या दिवशी तालुक्यातील बेटमोगरा येथून ७
बाराहाळी येथून ११ सांगवी बेरळी येथून ६ बेरळी खु. येथून १ असे एकूण २५ अर्ज दाखल केले. २८ डिसेंबर रोजी ५०९ जनांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर २९ डिसेंबर रोजी ८५६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर ३० डिसेंबर रोजी शेवटच्या दिवशी मात्र १ हजार ६२२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. असे एकूण ३ हजार १२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता ही उमेदवारी संख्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या ४ डिसेंबर रोजी किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, हे स्पष्ट होणार आहे.
या निवडणूक कामात तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, नायब तहसीलदार महेश हांडे, नायब तहसीलदार एस.एस. मामिलवाड, नायब तहसीलदार आर.आर. पदमावार, प्रशांत लिंबेकर, सहनिवडणूक विभागाचे कर्मचारी काम पाहत आहेत.