शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

कामाचा ताण वाढतोय!

By admin | Updated: October 7, 2015 03:38 IST

पूर्वी राज्यभरात २२ लाख जि.प. कर्मचारी होते. मात्र आज ती संख्या १४ लाखांपर्यंत कमी झाली आहे.

रिक्त पदे कधी भरणार ? : जि.प. कर्मचारी कृती समितीचा सवाल नागपूर : पूर्वी राज्यभरात २२ लाख जि.प. कर्मचारी होते. मात्र आज ती संख्या १४ लाखांपर्यंत कमी झाली आहे. यामुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. यातून प्रत्येक कर्मचारी रोज नव्या समस्येला तोंड देत आहे. रिक्त झालेली पदे वेळीच न भरल्यामुळे आज ही स्थिती निर्माण झाली आहे. या रिक्त पदांच्या कामाचा भार इतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना तीन-तीन पदांचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. दुसरीकडे रोज नवनवीन योजना येत आहेत. या सर्व चक्रात जि.प.तील कर्मचारी भरडला जात असल्याची व्यथा नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटना कृती समितीने मंगळवारी ‘लोकमत व्यासपीठ’च्या मंचावर व्यक्त केली. आजपर्यंत जि.प.तील सर्व कर्मचारी वेगवेगळ्या संघटनांमध्ये विखुरलेले होते. काही लोकांनी स्वत:च्या स्वार्थापोटी वेगवेगळी दुकाने थाटली होती. परंतु आता त्या सर्व संघटनांनी आपसातील मतभेद दूर करू न ‘नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटना कृती समिती’ तयार केली आहे. यात नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ (जिल्हा शाखा, नागपूर) व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकारप्रणीत) अशा तीन संघटनांमधील सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कृती समितीच्या माध्यमातून मागील २ सप्टेंबर रोजी संप पुकारण्यात आला होता. तो या कृती समितीचा पहिला लढा असून, शंभर टक्के यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून जि.प. कर्मचाऱ्यांची सर्व शक्ती एकजूट झाली आहे. यामधील सर्व संघटनांचा उद्देश एकच आहे. ृती समितीने त्यांना एकत्र बांधण्याचे काम केले आहे. या चर्चेत कृती समितीचे अध्यक्ष विलास बारापात्रे, कार्याध्यक्ष गोपिचंद कातुरे, कोषाध्यक्ष संजय तांबडे व सल्लागार संजय सिंग आणि संजय धोटे यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)अगोदर मुख्यालयी सोयी-सुविधा द्या राज्य शासनाकडून जि.प. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याची सक्ती केली जात आहे. परंतु गावखेड्यातील कर्मचाऱ्यांसाठी तेथे कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. मग अशा स्थितीत तो कर्मचारी मुख्यालयी कसा थांबणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे सरकार मुख्यालयी थांबले नाही, तर घरभाड्यासह इतर लाभ बंद करण्याची धमकी देत आहे. शासनाची ही सक्ती चुकीची असून, अगोदर मुख्यालयी राहण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करा आणि नंतरच अशा जाचक अटी लागू करा, अशी मागणी यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पगारासाठी पायपीटआतापर्यंत जि.प. कर्मचाऱ्यांना महिन्याच्या १ तारखेला पगार मिळत होता. परंतु राज्य शासनाने अलीकडेच सेवार्थ प्रणाली सुरू करू न पगाराची सर्व देयके आॅनलाईन भरणे अनिवार्य केले आहे. मात्र यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना सहा-सहा महिने पगाराची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक गावात इंटरनेट सुविधा नसल्याने त्यांना पगार बिल तयार करण्यासाठी नागपुरात यावे लागत आहे. शिवाय अनेकदा लिंक फेलचा फटका सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, अनेक कर्मचाऱ्यांनी घर बांधण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. परंतु वेळेवर पगार मिळत नसल्याने ते कर्जाचा हप्ता वेळेवर भरू शकत नसल्याने अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्य शासनाची ही सर्व चलाखी असून मुद्दाम कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला.