शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कधी होणार ‘सेफ सर्जरी’?

By admin | Updated: March 1, 2017 02:15 IST

हाडाच्या शस्त्रक्रियेत रुग्णाला भूल देण्याचे इंजेक्शन देताच रुग्णाचे हृदय बंद पडले.

मेडिकल : शस्त्रक्रिया सुरू होत नाही तोच रुग्णाचा मृत्यू नागपूर : हाडाच्या शस्त्रक्रियेत रुग्णाला भूल देण्याचे इंजेक्शन देताच रुग्णाचे हृदय बंद पडले. यातच ६६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ५०० प्रकरणांमध्ये अशा एक-दोन घटना घडतात असे म्हणून डॉक्टरांनी हात वर केले, मात्र सुरक्षित शस्त्रक्रियेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असताना अशा घटना घडतातच कशा, व मेडिकलमध्ये कधी होणार सुरक्षित शल्यक्रिया (सेफ सर्जरी) असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तुळसाबाई जुमळे (६६) रा. बेलतरोडी असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळसाबाई जुमळे यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या वरील हाड तुटले होते. यावरील उपचारासाठी त्या ११ फेब्रुवारी रोजी मेडिकलच्या अस्थिरोग विभागाच्या युनिट तीन अंतर्गत येणाऱ्या वॉर्डात भरती झाल्या. २७ फेब्रुवारी रोजी मेडिकलच्या ‘शस्त्रक्रिया गृह-डी’मध्ये शस्त्रक्रियेसाठी त्यांना नेण्यात आले. येथे बधिरीकरण तज्ज्ञाने भूलीचे इंजेक्शन देताच तुळसाबाई यांचे अचानक हृदय बंद पडले (कार्डिआॅक अरेस्ट). डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावर हृदय पुन्हा सुरू झाले, परंतु थोड्याच वेळात पुन्हा ‘कार्डिआॅक अरेस्ट’ येऊन त्यांचा मृत्यू झाला. भूल देण्याचे इंजेक्शन एका शिकाऊ डॉक्टरने दिले आणि त्यामुळे मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. परंतु या संदर्भात त्यांनी लेखी तक्रार केली नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या प्रकरणाच्या संदर्भात अधिक माहिती देताना बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र तिरपुडे म्हणाले, शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णाचे वय फार जास्त होते, त्यांना रक्तदाबाचा आजार होता परंतु शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे होते. यातील धोके रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात आणून देण्यात आले होते. त्यांच्या संमतीनंतरच शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. परंतु त्या पूर्वीच त्यांचे हृदय बंद पडले. अशा रुग्णांमध्ये धोक्याची शक्यता अधिक असते, असेही ते म्हणाले. ना चेक लिस्ट, ना अद्ययावत यंत्रणा अनेक खासगी व मोठ्या रुग्णालयात ‘सेफ सर्जरी’कडे गंभीरतेने पाहिले जात असताना शासकीय रुग्णालयांमध्ये ती सोय का नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एका वरिष्ठ शल्यचिकित्सकाच्या मते काही चांगल्या खासगी इस्पितळांमध्ये शस्त्रक्रियांना गंभीरतेने घेतले जाते. रुग्णाच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देणारे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार (डब्ल्यूएचओ) ‘चेक लिस्ट’ तयार केली जाते. शल्यचिकित्सकापासून ते बधिरीकरणतज्ज्ञ व परिचारिकांच्या चमूला विशिष्ट प्रशिक्षण दिले जाते, आणि नंतरच शस्त्रक्रिया केली जाते. मात्र शासकीय रुग्णालयांमध्ये कुठलीही ‘चेक लिस्ट’ राहत नाही. अद्ययावत तंत्रज्ञान नाही. यातच रुग्णांची संख्या मोठी असल्याने बारीकसारीक गोष्टींना विशेष महत्त्व दिले जात नसल्याने असे धोके होतात, असेही ते म्हणाले.