शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पेंचमधील वाघिणीची ‘गिनीज बुक’ कडे वाटचाल

By admin | Updated: October 28, 2015 03:05 IST

मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात अधिवास करीत असलेल्या टी-१५ (कॉलरवाली) या वाघिणीची ‘गिनीज बुक’कडे वाटचाल सुरू झाली आहे.

सहा वर्षांत दिला २२ पिलांना जन्म : वन विभागाकडून अर्ज सादरसंजय रानडे  नागपूरमध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात अधिवास करीत असलेल्या टी-१५ (कॉलरवाली) या वाघिणीची ‘गिनीज बुक’कडे वाटचाल सुरू झाली आहे. या वाघिणीने मागील सहा वर्षांत तब्बल २२ बछड्यांना जन्म देऊन वन्यजीव प्राण्यांमध्ये एक नवा विक्रम नोंदविला आहे. विशेष म्हणजे, त्या २२ बछड्यांपैकी ४ बछड्यांचा मृत्यू झाला असून, इतर १८ बछडे आजही जंगलात सुरक्षित अधिवास करीत आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने या ‘टी-१५’ वाघिणीची विशेष दखल घेऊन, तिची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, यासाठी अर्ज सादर केल्याची माहिती पुढे आली आहे. यासंबंधी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे (मध्य प्रदेश) क्षेत्र संचालक सुभाषरंजन सेन यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. माहिती सूत्रानुसार टी-१५ या वाघिणीने मागील २००८ ते २०१५ या काळात सर्व बछड्यांना जन्म दिला आहे. जाणकारांच्या मते, वन्यप्राण्यांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या वाघिणीने एवढ्या बछड्यांना जन्म दिल्याची घटना पुढे आली आहे. मागील २००५ मध्ये याच जंगलातील बडी मादा या वाघिणीने ‘टी-१५’ हिला जन्म दिला होता. यानंतर काहीच दिवसांत ‘टी-१५’ ही पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनली. बडी मादा या वाघिणीने ‘टी-१५’ सह इरत तीन पिलांना जन्म दिला होता. दरम्यान बीबीसीने त्या बडी मादासह सर्व चारही बछड्यांवर ‘स्पाय इन दि जंगल’ नावाचा लघुपट तयार केला होता. यानंतर ‘टी-१५’ या वाघिणीने २००८ मध्ये सर्वप्रथम तीन बछड्यांना जन्म दिला होता. तेव्हा ती केवळ अडीच ते तीन वर्षांची होती. यानंतर ती २५ मे २००८ रोजी सर्वप्रथम आपल्या बछड्यांसह आढळून आली होती. १० आॅक्टोबर २००८ रोजी ती दुसऱ्यांदा चार छोट्या बछड्यांसह दिसली. यापाठोपाठ २०१० मध्ये तिने पुन्हा पाच बछड्यांना जन्म दिला. एका वर्षांत एखाद्या वाघिणीने पाच पिलांना जन्म दिल्याची ही प्रथमच घटना पुढे आली. यानंतर २०१२ मध्ये पुन्हा तीन, २०१३ मध्ये तीन आणि २०१५ मध्ये चार अशाप्रकारे सहा वर्षांत लागोपाठ २२ पिलांना तिने जन्म दिला.