शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

तूर डाळीचा घोटाळा अधांतरीच

By admin | Updated: July 10, 2014 00:47 IST

अखेर कळमना भागातील १२ लाखांच्या तूर डाळीच्या अफरातफरीचे प्रकरण अधांतरीच राहिले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून केवळ तीन हजार रुपये किमतीची ५० किलो तूर डाळ जप्त केली.

जप्ती केवळ ५० किलोची : दोन्ही आरोपी कारागृहातनागपूर : अखेर कळमना भागातील १२ लाखांच्या तूर डाळीच्या अफरातफरीचे प्रकरण अधांतरीच राहिले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून केवळ तीन हजार रुपये किमतीची ५० किलो तूर डाळ जप्त केली. त्यानंतर तपासात ठोस प्रगती नसल्याने दोन्ही आरोपींची न्यायालयाच्या आदेशान्वये मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी करण्यात आली. मंगलसिंग गुलाबसिंग राजपूत आणि पूरण माणिकलाल पटेल रा. हुलकी घाट जबलपूर, अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी राजपूत हा ट्रकचालक तर पटेल हा ढाबामालक आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, धान्य व्यापारी आनंदकुमार जैन यांनी कळमना पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदवला. या अहवालानुसार चिखली भागातील संमप्रीत फूड इंडस्ट्रिज आणि पूजा डाळ उद्योगाने ट्रकचालक राजपूत याच्यामार्फत एमपी-१७-एचएच ३१३४ क्रमांकाच्या ट्रकमधून ३२० पोती तूर डाळ २३ जून २०१४ रोजी कटनी येथील अनिल इंडस्ट्रिजकडे रवाना केली होती. परंतु ही डाळ संबंधित इंडस्ट्रिजकडे पोहोचलीच नाही. ही डाळ २१ टन होती आणि किंमत १२ लाख ७७ हजार रुपये होती. या प्रकरणी कळमना पोलिसांनी भादंविच्या ४०७, ४११, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी ट्रकचालक मंगलसिंग राजपूत याला ३० जून रोजी अटक करून, त्याचा तीनवेळा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. चौकशीत या ट्रकचालकाने बोलेरो वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी आपणास मारहाण करून डाळीसह ट्रक लुटून नेल्याचे सांगितले होते. त्याने ५० किलो वजनाच्या डाळीचे एक पोते हुलकी घाटातील पूरणलाल पटेल नावाच्या ढाबामालकास विकल्याचेही सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी ४ जुलै रोजी पूरण पटेल याला अटक करून ३ हजार रुपये किमतीची ५० किलो डाळ जप्त केली होती. उर्वरित डाळ आणि ट्रक अद्यापही बेपत्ता आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी रिमांडअंतर्गत कारागृहाकडे रवानगी करण्यात आली. (प्रतिनिधी)