शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाद्वारे अवैध उत्खननावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 3, 2017 02:57 IST

खाणींच्या आसपास अवैध उत्खनन होत असल्याची बाब नाकारता येणारी नाही. पूर्वी यावर देखरेख करणे शक्य होत नव्हते.

खनिकर्म विभागाचे महानियंत्रक रंजन सहाय यांची ग्वाहीनागपूर : खाणींच्या आसपास अवैध उत्खनन होत असल्याची बाब नाकारता येणारी नाही. पूर्वी यावर देखरेख करणे शक्य होत नव्हते. मात्र आता रिमोट सेन्सिंग, सॅटेलाईट आणि ड्रोनसारख्या विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अवैध उत्खननाची माहिती घेणे सोपे झाले आहे. अ‍ॅन्ड्राईड मोबाईलचे अ‍ॅप तंत्रज्ञानही यासाठी अधिक उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे अशा तंत्रज्ञानाचा वापर करून अवैध उत्खननावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची ग्वाही भारतीय खनिकर्म विभाग (आयबीएम)चे महानियंत्रक रंजन सहाय यांनी दिली.टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्यावतीने आयोजित मिट दि प्रेस कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील बॉक्साईट, मॅगनीज, लोह, सोने या बिगर इंधन खाणी आयबीएमच्या अखत्यारित येतात. अशा २१०० खाणींवर आयबीएम नियंत्रण ठेवत आहे. आयबीएमने डिजिटल टेक्नॉलॉजीची मदत घेत सॅटेलाईट आधारीत मायनिंग सर्व्हिलन्स सिस्टीमच्या मदतीने पाहणी केल्यानंतर २९६ खाणींच्या लीज क्षेत्राच्या आसपास अवैध कारवाई होत असल्याचे आढळून आले. त्यापैकी ३२ खाणींजवळ अवैध उत्खनन होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला गेला. मात्र राज्य सरकारांकडून हवे ते सहकार्य मिळत नसल्याचे रंजन सहाय यांनी यावेळी स्पष्ट केले. सॅटेलाईट सिस्टीमसह आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून अवैध उत्खननावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रोनच्या मदतीने खाणींना स्टार रेटींग देण्याची योजना आयबीएमने सुरू केली आहे. ही योजना उपयुक्त ठरत असून आॅस्ट्रेलियासारखे जगातील देश या योजनेचा स्वीकार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आर्थिक, पर्यावरण व सामाजिक गोष्टींची सांगड घातल्यास नागरिकही विकासाला विरोध करीत नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी आयबीएमचे विभागीय नियंत्रक पीयूष शर्मा, मॉईलचे संचालक शुभांकर शोम, पत्रकार भवन ट्रस्टचे प्रदीप मैत्र, ब्रह्माशंकर त्रिपाठी उपस्थित होते.