शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

लाेकांच्या राेषामुळे बारगळली गाेंडखैरी काेळशा खाणीची जनसुनावणी

By निशांत वानखेडे | Updated: July 13, 2023 18:47 IST

गाेंडखैरी परिसरातील काेळशा खाणीचा पट्टा अदानी पाॅवर महाराष्ट्र लिमिटेडला देण्यात आला. येथे भूमिगत काेळसा खाण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

नागपूर/धामना : नागपूरपासून अवघ्या २० किलाेमीटर अंतरावरील कळमेश्वर तालुक्याच्या गाेंडखैरी येथे प्रस्तावित भूमिगत काेळसा खाणीची जनसुनावणी पर्यावरणवाद्यांनी अवघ्या दीड तासात उधळून लावली. खाणीचा अहवाल गावकऱ्यांना मराठीत न मिळाल्याचा आक्षेप घेत कायदेशीर प्रक्रियाच अवलंबली गेली नसल्याच्या आराेप केल्यानंतर हाेणाऱ्या प्रचंड विराेधामुळे ही जनसुनावणी रद्द करावी लागली.

गाेंडखैरी परिसरातील काेळशा खाणीचा पट्टा अदानी पाॅवर महाराष्ट्र लिमिटेडला देण्यात आला. येथे भूमिगत काेळसा खाण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र या काेळसा खाणीला आसपासच्या २४ प्रमुख गावे व ८० च्यावर लहान गावांनी विराेध सुरू केला आहे. कंपनीच्या अर्जानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गुरुवारी कळमेश्वर तालुक्याच्या कारली तलावाजवळ जनसुनावणी आयाेजित केली हाेती. सुनावणी अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चाैधरी, एमपीसीबीच्या विभागीय अधिकारी हेमा देशपांडे, एसआरओ राजेंद्र पाटील तसेच कंपनीचे अधिकारीही उपस्थित हाेते. एमपीसीबीच्या पत्रानंतर आधीच २४ ग्रामपंचायतींनी ठराव पारीत करीत खाणीला विराेध दर्शविणारे पत्र एमपीसीबीला सादर केले हाेते.

अपेक्षेप्रमाणे विराेध करणाऱ्या बहुतेक गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांसह पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्यही सुनावणीस हजर झाले हाेते. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, अनिल देशमुख व रमेश बंग तसेच कळमेश्वर पंचायत समिती सभापती प्रभाकर पवार, उपसभापती अविनाश पारधी, जि.प. सदस्य भारती पाटील आदी उपस्थित झाले हाेते. सुनील केदार यांनी खाणीसंदर्भात ग्रामपंचायतींना सादर केलेला अहवाल इंग्रजीत असल्याने नागरिकांना समजण्यास अडचणीचा असल्याचा आक्षेप घेतला. हा अहवाल मराठीतून दिला गेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. लाेकांनी ‘बंद करा बंद करा कोळसा खान बंद करा’ अशी नारेबाजी करीत आपला विराेध दर्शविला. नागरिकांकडून हाेत असलेला प्रचंड विराेध पाहता जनसुनावणी रद्द करण्याची घाेषणा आरडीसी सुभाष चाैधरी यांनी केली.

कायदेशीर प्रक्रिया दुर्लक्षित केली

यावेळी पर्यावरण तज्ज्ञ सुधीर पालिवाल यांनी एमपीसीबीची वेबसाईट दाेन दिवसांपासून बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. वेबसाईट बंद असल्याने बहुतेकांना कंपनीचा अहवाल वाचता आला नाही व सुनावणीत ऑनलाईनही उपस्थित राहता आले नाही. शिवाय ज्याने खाणीचा अहवाल तयार केला, त्याच व्यक्तिकडून सुनावणीत सादरीकरण हाेणे अपेक्षित हाेते पण एका प्रयाेगशाळेच्या प्रतिनिधीद्वारे खाणीचा अहवाल सादर करण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.

खाणीच्या समर्थनात एकही उभा झाला नाहीसुनावणीवर आक्षेप हाेत असताना काेळसा खाणीच्या समर्थनात काेण आहे, असे विचारण्यात आले तेव्हा कुणीही हात वर केले नाही व शुकशुकाट पसरला. विराेध कुणाचा आहे, असे विचारल्यावर उपस्थित सर्व नागरिक एकाच वेळी उभे हाेऊन खाणीच्या विराेधात घाेषणाबाजी करू लागले.

लाेकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून तीव्र विराेध झाल्याने सध्या जनसुनावणी रद्द करण्यात आली. लाेकांनी खाणीबाबत अहवालाचे सादरीकरण बंद पाडले. यापुढे सुनावणी हाेणार, नाही हाेणार किंवा प्रकल्पाबाबत आता काही सांगता येणार नाही.

- हेमा देशपांडे, विभागीय अधिकारी, एमपीसीबी