अनेक वस्त्यात पाणी : झाडे पडलीनागपूर : उपराजधानीत पहिल्या पावसामुळे अनेक वस्त्यात पाणी साचले. त्यामुळे पालिका प्रशासनाची पोलखोल झाली. चिंचभुवन गाव आणि नवीन वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. उन्हाळ्यापासून कोरडा पडलेला या भागातील नाला पहिल्याच पावसाने दुथडी भरून वाहू लागला. रस्ते खोलगट असल्याने तेथे पाणी साचले होते. मोकळ्या जागेवर टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर पाऊस पडल्याने त्याला वास सुटला होता. महापालिका फक्त रस्ते साफ करते, मात्र तो कचरा मोकळ्या जागेवर टाकण्यात येत असल्याने तेथे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शाळेची मुले झाली ओलीशाळकरी मुलांनी मात्र पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. शाळा सुरू होण्याच्या वेळी सकाळी आणि दुपारी पालकांनी मुलांची काळजी घेत त्यांना छत्रीत शाळेत नेऊन दिले. पण शाळा सुटल्यावरही पाऊस कोसळत असल्याने मुलांना पावसात भिजण्याचा मोह आवरला नाही. घराकडे सायकल आणि पायी जाताना मुलांनी आडोशाला उभे राहून पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा मस्तपैकी पावसात भिजण्यालाच पसंती दिली. अनेक मुलांना शाळेत जाण्यासाठी पालकांनी आॅटोरिक्षांची व्यवस्था केली आहे. साधारणत: आॅटोरिक्षाचालक विद्यार्थ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून आॅटो विशिष्ट कापडाने बंद करतात. पण इतका मुसळधार पाऊस कोसळेल याची कल्पना नसलेल्या आॅटोचालकांनी आज फारशी व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे आॅटोने शाळेत जाणारे विद्यार्थी चिंब भिजले. यात नर्सरी आणि केजीच्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यांना पावसात भिजण्याचा आनंद होता, पण त्यांच्या पालकांना मात्र त्यांच्या तब्येतीची काळजी असल्याने पालकांनी आॅटोचालकांकडे नाराजी व्यक्त केली. चिटणवीसपुरा, ग्रेट नागरोडरेशीमबाग ते ग्रेट नागरोडवरील अशोक चौकात नागनदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलामुळे आधीच वाहतुकीला अडथळा होत असताना मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे त्यात पुन्हा भर पडली. कडेला पडलेल्या बांधकाम साहित्यामुळे वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. अनेक दिवस काम बंद असतानाही साहित्य रस्त्यावर पडले होते. याच चौकाचा भाग एका भाजी विक्रेत्याने व्यापल्याने दुचाकी वाहनांना मार्ग काढताना बरीच कसरत करावी लागली. याशिवाय रेशीमबागकडे जाताना मैदानातील पाणी रस्त्यावर सोडण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी चालविताना पाणी अंगावर उडत होते. पाण्यापासून बचाव करताना दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या. गंभीर दुखापत झाली नसली तरीही रस्त्यावरून वाहणारे पाणी दुचाकी वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरले होते. याच परिसरात नागनदीच्या काठावर झोपड्या बांधून राहणाऱ्यांसाठी मुसळधार पाऊस जीवघेणा ठरू शकतो. झोपड्यातील रहिवाशांना मनपाच्या अतिक्रमण विभागाने अनेकदा हलविले आहे. पण पावसाची पर्वा न करता काही लोक काठावरच निवासाला आहेत. या परिसराची पाहणी केली असता मोठी घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवसभर पावसाचा जोर पाहता काही सामाजिक संघटनांनी नागनदी काठावरील रहिवाशांना इतरत्र हलविण्याची तयारी चालविली आहे. रात्रभर पाऊस कोसळल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याआधीही शासनाने वारंवार इशारा देऊनही नदीकाठावरील रहिवासी घरे सोडण्यास तयार नाही. थोडा जास्त पाऊस पडल्यास नदीतील पाणी थेट घरात शिरते. गेल्या वर्षी या वस्तीतील रहिवाशांना मनपाच्या शाळांमध्ये हलवावे लागले होते. या वर्षी अशी परिस्थिती उद्भवू शकते, अशी शक्यता सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.नरेंद्रनगर पावसाच्या पाण्याचा सर्वात जास्त फटका नरेंद्रनगर पुलाखालून रहदारी करणाऱ्यांना बसला. मुसळधार पाऊस झाल्यास पुलाचा एक भाग पाण्याखाली येतो. मागील १० वर्षांपासून हीच स्थिती आहे, परंतु अद्यापही उपाययोजना नाही. पाणी काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने येथे २० हॉर्सपॉवरचे दोन मोटारपंप बसविले आहेत. आजच्या पावसाचा फटका मिलिंद सोसायटी, गोपालनगर नाल्यालगत झोपडपट्टी, सुमितनगर, स्टेट बँक कॉलनी व गाडगेनगर वसाहतींना बसला आहे. प्रभागातील ९० टक्के भागात पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र यातील २० टक्के नाल्या मोडकळीस आल्या आहेत. उर्वरित नाल्यांची सफाई करण्यासाठी महापालिकेडे विशेष यंत्रणा नाही. मिलिंद सोसायटीमिलिंद सोसायटीत सुमारे ३५ घरे आहेत, मात्र या सोसायटीला रस्ताच नाही. यातच ही सोसायटी खोलगट भागात आहे. पाऊस झाल्यास संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरूप येते. आज सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. जयप्रकाशनगरपांडे ले-आऊटचे पावसाचे पाणी उतार भागात असलेल्या जयप्रकाशनगर वसाहतीत येते. विशेषत: हा मार्ग पाण्याखाली येतो. मागील वर्षी जयप्रकाशनगर वसाहतीत अनेक घरात पाणी शिरले होते. आज दुपारनंतर पावसाने उसंत दिल्याने पाणी शिरले नाही. प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी आहे. सोमलवाडासोमलवाडा येथील राहुलनगर झोपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी नेहमीच साचते. मंगळवारच्या पावसामुळे सखल भागात पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. या वसाहतीत ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणी नागरिकांनी केली. अजनीअजनी परिसरातील चुनाभट्टी झोपडपट्टीत आज पाणी शिरले. मागील वर्षी सलग पाच दिवस झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांची झोप उडाली होती. आजच्या सकाळच्या पावसामुळे पुन्हा तीच स्थिती निर्माण तर होणार नाही ना, अशी शंका अनेकांनी उपस्थित केली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
सरीवर सरी ....
By admin | Updated: July 16, 2014 01:21 IST