कार्यशाळा : लोकमत बाल विकास मंच व अकॅडमी आॅफ टेक्निकल इंटेलॅक्टचे आयोजननागपूर : लोकमत बाल विकास मंच व अकॅडमी आॅफ टेक्निकल इंटेलॅक्टच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ‘वैदिक मॅथ’वर दहा दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रशिक्षक सूरज वैद्य यांनी ‘वैदिक मॅथ’चे टेक्निक्स, अॅडिशन, भागाकार, गुणाकार, वर्गमूळ, धनमूळ, वर्ग समीकरणे, त्रिकोणामितीबाबत माहिती देऊन त्याचा सराव करून घेतला. वैदिक मॅथ कॅलक्युलेशन पद्धतीमध्ये येते. या पद्धतीद्वारे मुलांच्या डोक्यावर जास्त ताण न येता मोठ्यात मोठे गणित कमी वेळेत सोडविता येते. या प्रणालीमुळे मुलांची बौद्धिक क्षमता अधिकाधिक प्रमाणात वाढते. हातांच्या बोटांचा वापर करून उत्तर कसे काढावे, याचे धडे वैद्य यांनी विद्यार्र्थ्याना दिले. न्यूमोनिक्सवर टीप्स यावेळी देण्यात आल्या. वेळेची बचत होत असल्यामुुळे स्पर्धा परीक्षेसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणारी आहे. अनेक विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती असते. या पद्धतीमुळे ही भीती नाहीशी होते. कार्यशाळेमध्ये अगदी हसतखेळत गणित कसे सोडवायचे, याचा सराव विद्यार्थ्यांनी केला. अनेक गणिते विद्यार्थ्यांनी अल्पावधीत सोडविली.(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी घेतले ‘वैदिक मॅथ’चे धडे
By admin | Updated: July 10, 2014 00:55 IST