शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांना ‘टार्गेट’

By admin | Updated: April 16, 2015 02:10 IST

दरवर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अभियांत्रिकीच्या रिक्त जागांचे आव्हान : महाविद्यालयांचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’योगेश पांडे ल्ल नागपूरदरवर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विद्यार्थ्यांचा दुष्काळ मिटविण्यासाठी महाविद्यालयांकडून निकाल लागायला बराच अवधी असतानादेखील शोधमोहीम सुरू झाली आहे. महाविद्यालयांकडून ‘मार्केटिंग’चे विविध फंडे सुरू झाले असून चक्क प्राध्यापकांनादेखील ‘टार्गेट’ देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१४-१५ या वर्षात राज्यभरात ४० टक्क्यांहून अधिक तर एकट्या नागपूर विभागात ४५ टक्के जागा रिक्त होत्या, हे विशेष.राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘जेईई-मेन’ (जॉईन्ट एन्ट्रन्स एक्झाम) १० व ११ एप्रिल रोजी पार पडली. परंतु गेल्या वर्षीची रिक्त जागांची संख्या लक्षात घेता अभियांत्रिकी महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षांच्या अगोदरपासूनच विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले. बारावीच्या अनेक परीक्षा केंद्रांवर अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रतिनिधी संस्थेचे माहितीपत्रक वाटताना दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे ‘जेईई’च्या परीक्षेच्या दिवशी तर चक्क प्राध्यापक मंडळीदेखील अनेक ठिकाणी परीक्षा केंद्राबाहेर पालकांना महाविद्यालयांबाबत माहिती देताना दिसून आले. अनेक महाविद्यालयांनी प्राध्यापकांना विद्यार्थ्यांचे ‘टार्गेट’ दिले आहे. नागपुरातील एका मोठ्या शिक्षणसंस्थेतील प्राध्यापकांना प्रत्येकी पाच विद्यार्थी आणण्यास सांगितले आहे. यामुळे प्राध्यापक मंडळी चिंतित असल्याची माहिती एका जेष्ठ प्राध्यापकाने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.राज्यातील ३६० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांत दीड लाखांहून अधिक जागा आहेत. मागील वर्षी यातील सुमारे ४० टक्के म्हणजे ६४ हजारांहून अधिक जागा रिक्त होत्या. गेल्या काही वर्षांपासून रिक्त जागांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. हीच बाब मोठ्या प्रमाणात उघडलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.गेल्यावर्षीप्रमाणे यंदादेखील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. ही स्थिती पाहता महाविद्यालय प्रशासनांच्या चिंतेत निश्चितच आणखी भर पडली आहे. हीच बाब लक्षात घेता अनेक महाविद्यालयांनी ‘मॅनेजमेंट कोटा’तून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. बाहेरील राज्यांकडे धाव४जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी उपराजधानीतील महाविद्यालयांकडून निरनिराळ््या ‘मार्केटिंग’ फंड्यांचा वापर केला जात असून अनेक महाविद्यालयांचे प्राध्यापक व प्रतिनिधींनी यासाठी उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व पंजाब या राज्यांकडे धाव घेतली आहे. ‘एज्युकेशन फेअर’ तसेच थेट संपर्काच्या माध्यमातूनदेखील महाविद्यालयांकडून विद्यार्थी मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक महाविद्यालयांनी तर ‘कमिशन एजंट’देखील नेमले आहेत. अनेक जण विद्यार्थ्यांशी ‘आॅनलाईन’ संपर्क साधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिकवणी वर्गांकडे ‘फोकस’४अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी राज्यभरात शिकवणी वर्गांचे पेव फुटले आहे. हीच बाब लक्षात घेत काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी शिकवणीवर्ग चालकांशी संपर्क साधला आहे. कमी गुण मिळाले तर ‘मॅनेजमेन्ट कोटा’मधून तुम्हाला निश्चित प्रवेश देण्यात येईल, असे सांगत असताना विद्यार्थ्यांना विविध ‘आॅफर्स’देखील देण्यात येत असल्याची माहिती आहे.दर्जा टिकविण्याची गरज ४अनेक खासगी महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते. याचे कारण म्हणजे तेथील दर्जा. प्रवेशासाठी महाविद्यालये कुठल्या ‘मार्केटिंग’ फंड्याचा उपयोग करतात हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु जर त्यांनी दर्जावर भर दिला तर त्यांना धावपळ करण्याची गरज भासणार नाही, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी व्यक्त केले.