शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

गुणवत्ता सिद्ध करूनही कर्मचारी उपेक्षित का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:07 IST

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सवाल : काम बंद आंदोलनाचा ऑनलाईन प्रशिक्षणाला फटका नागपूर : राज्याचा शिक्षण विभाग ...

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सवाल : काम बंद आंदोलनाचा ऑनलाईन प्रशिक्षणाला फटका

नागपूर : राज्याचा शिक्षण विभाग आणि शाळा यांच्यामध्ये सेतू म्हणून काम करणारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला लॉकडाऊनच्या काळात दिलेल्या सर्व उपक्रमात गुणवत्ता सिद्ध केली आहे. लॉकडाऊनच्या काळातील ऑनलाईनच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना शासनाने उपेक्षित ठेवले आहे. चार महिन्यापासून वेतनापासून वंचित असलेल्या या कर्मचाऱ्यांनी आमचा काय दोष, असा सवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला केला आहे. कर्मचाऱ्यांनी वेतन नसल्यामुळे काम बंद आंदोलन केल्याने ऑनलाईन प्रशिक्षणाला फटका बसला आहे.

सप्टेंबर महिन्यापासून या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. राज्यात या संस्थेत ९०० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्याची सर्व जबाबदारी पार पाडली. कार्यक्षमता प्रतवारी दर्शक (पीजीआय), असर अहवाल, राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण, निष्ठा प्रशिक्षण, दीक्षा अ‍ॅप, शिक्षण परिषदेचे प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आले. या उपक्रमातून राज्याला देशाच्या अव्वलस्थानी पोहचविले. ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्यानंतरही पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकी, स्वाध्यायमाला उपक्रमाचा आढावा घेण्याचे काम अजूनही सुरू आहे. पण आता ही कामे करण्याची कर्मचाऱ्यांची मानसिकता राहिली नाही. चार महिन्यापासून वेतन नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. नागपूर जिल्ह्यातील संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी मुलाबाळासह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

ही संस्था केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानावर चालते. या संस्थेला नॉन प्लॅनमध्ये घ्यावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. शीर्षस्थ संस्थेने केलेल्या चुकांचा त्रास आम्हाला सहन करावा लागत असल्याची भावना येथील कर्मचाऱ्यांची आहे. जिल्ह्यात १८ कर्मचारी असून, कार्यालय ठप्प पडले आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा असून अधिकारी, मंत्री यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून आर्जव केले जात आहे.

- हे कर्मचारी कुटुंबासह वेतनासाठी माझ्याकडे येतात. आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतो आहे. पण वर कुणीच दखल घ्यायला तयार नाही. कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे त्यांच्याकडून काम करवून घेण्यास मी हतबल आहे.

हर्षलता बुराडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था