शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हाती ‘सॉईल हेल्थ कार्ड’

By admin | Updated: May 30, 2017 01:54 IST

आज माणसाच्या आरोग्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहिला टप्पा पूर्ण : १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना मिळाले कार्ड जीवन रामावत । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज माणसाच्या आरोग्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रासायनिक खते, जहाल विषारी औषधे आणि पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. जमीन निकस होऊ लागली आहे. शेतकऱ्यांची या संकटातून सुटका करण्यासाठी केंद्र शासनातर्फे मागील तीन वर्षांपासून ‘जमीन आरोग्य पत्रिका’ (सॉईल हेल्थ कार्ड) अभियान राबविले जात आहे. या अभियानात जिल्ह्यातील एकूण २ लाख ६८ हजार खातेधारक शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या जमिनीच्या आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड) देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या अभियानाचा नुकताच पहिला टप्प्पा पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्यात २०१५-१६ मध्ये ८२४ गावांतील एकूण २६ हजार ४६ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार वर्षअखेरीस ४३ हजार ९५६ आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. यानंतर २०१६-१७ या दुसऱ्या वर्षी ५२ हजार ९१ आरोग्य पत्रिकांचे उद्दिष्ट होते, त्यानुसार ५१ हजार ६६ आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. आता २०१७-१८ पासून या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने या दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्यात येणाऱ्या आरोग्य पत्रिकांचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण १८९९ गावे असून, त्यापैकी पहिल्या वर्षासाठी ९४९ गावांची निवड करण्यात आली आहे. या सर्व गावातील एकूण १ लाख ३४ हजार २०० शेतकऱ्यांना पुन्हा ‘आरोग्य पत्रिका’ वाटप केल्या जाणार आहेत. शिवाय पुढील वर्षी उर्वरित शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका देण्यात येईल. अशाप्रकारे येत्या २०२१ पर्यंत तिन्ही टप्पे पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर तिन्ही टप्प्यातील शेतकऱ्यांच्या आरोग्य पत्रिकांचे सूक्ष्म अध्ययन करून जमिनीत कोणती सुधारणा झाली की बिघाड झाला, याचा निष्कर्ष काढला जाणार आहे. अलीकडे जिल्ह्यातील शेतकरी हा आपल्या जमिनीच्या आरोग्यासंबंधी प्रचंड सजग झाला आहे. अनेक शेतकरी स्वत:हून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयातून माती परीक्षण करून घेत आहेत. त्याचा चांगला परिणामसुद्धा दिसू लागला आहे. शेतकरी जागृत झाला पूर्वी जिल्ह्यातील शेतकरी माती परीक्षणासाठी फारसा उत्सुक दिसून येत नव्हता. मात्र मागील दोन-तीन वर्षांत प्रचंड बदल झाला आहे. आज शेतकरी हा जागृत झाला असून, तो स्वत: माती परीक्षणासाठी पुढे येत आहे. हे चांगले संकेत आहे. मागील दोन वर्षांत आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हाती त्याच्या जमिनीची ‘आरोग्य पत्रिका’ पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आम्हाला यशही मिळाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली असून, यात एकूण ७४,८२६ मातीचे नमुने परीक्षण केले जाणार आहे. त्यापैकी मागील एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी ११,२२४ नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहेत. तसेच पुढील जून आणि जुलै महिन्यात प्रत्येकी ७,४८३ नमुन्यांचे परीक्षण केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेत, आपल्या शेतातील मातीचे नि:शुल्क परीक्षण करून घ्यावे. अर्चना कोचरे, जिल्हा मृद सर्र्वेक्षण अधिकारी.