शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

जीवनावश्यक इंजेक्शनचा तुटवडा

By admin | Updated: December 3, 2014 00:36 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) जीवनावश्यक ७० इंजेक्शनामधून ५० टक्केच उपलब्ध आहेत, तर जीवनावश्यक औषधांच्या यादीतील ५८ मधून फक्त ३० औषधे उपलब्ध आहेत.

मेडिकलमधील गंभीर रुग्ण अडचणीत : महिनाभरापासून सलाईनही नाहीसुमेध वाघमारे - नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) जीवनावश्यक ७० इंजेक्शनामधून ५० टक्केच उपलब्ध आहेत, तर जीवनावश्यक औषधांच्या यादीतील ५८ मधून फक्त ३० औषधे उपलब्ध आहेत. यातील अनेक औषधी संपण्याच्या मार्गावर आहेत. मेडिकलमध्ये दिवसाकाठी हजाराच्यावर लागणारे सलाईन महिनाभरापासून नाही. याचा परिणाम रुग्णसेवेवर पडला आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकावरील मेडिकलची अशी स्थिती आहे.मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात औषधाच्या नावाने ठणठणाट आहे. अपघातग्रस्त व अनोळखी व्यक्ती आल्यास त्याचे नातेवाईक येईपर्यंत त्याच्यावर औषधोपचार होत नाही. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांसाठी औषधीही मोजक्याच आहेत. यातही महिनाभरापासून मेडिकलमध्ये सलाईन नाही. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात दोन हजाराच्यावर येत असलेल्या रुग्णांवर आणि भरती होत असलेल्या दीड हजाराच्या वर रुग्णांवर सद्यस्थितीत जीवनावश्यक फक्त ४० इंजेक्शनेच उपलब्ध आहेत. हे इंजेक्शन बीपीएलच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येत असल्याने इतर गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. दहापैकी फक्त दोनच सलाईन जीवनावश्यक औषधांमध्ये सलाईनचाही समावेश होतो. परंतु मागील महिन्यापासून आरएल व डीएनएस या सलाईन सोडल्यास डेक्सट्रोज ५, १०, व २५, नॉर्मल सलाईन यासारख्या आठच्यावर विविध सलाईन नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांना सलाईनसाठी धावाधाव करावी लागते. अनेक वेळा रुग्णांजवळ पैसेही राहत नाही. अशा वेळी पैशांची मदत होईपर्यंत रुग्ण ताटकळत असतो. अति गंभीर रुग्णांना, अपघातग्रस्त रुग्णांना देण्यात येणाऱ्या सलाईनचाही तुटवडा पडला आहे.४० टक्केच औषधेमेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी पाच औषधे लिहून दिली असेल तर त्याच्या हाती फक्त दोनच औषधी पडतात. इतर औषधे बाहेरून खरेदी करण्यास सांगितले जाते. विशेष म्हणजे, यावेळी रुग्णाने बीपीएलचे कार्ड दाखविले तरी त्याला औषध मिळत नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मेडिकलमध्ये ४० टक्के औषधांचा तुटवडा आहे. परिणामी बाह्यरुग्ण विभागात मोजक्याच औषधांचे वितरण होत असल्याची माहिती आहे.दोन वर्षांनंतरही नवे दर करार नाहीशासकीय रुग्णालयांना रेट काँट्रॅक्टवरील (दर करार) उपलब्ध औषध खरेदीचा नियम आहे. जानेवारी २०१३ रोजी हे दर करार संपले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) त्याचवेळी नवे करार करायला हवे होते. मात्र दोन वर्षे होऊनही या दर कराराला मुदतवाढ देऊन वेळ मारून नेली आहे. विशेष म्हणजे आॅक्टोबर २०१४ रोजीच हे दर करार संपले. परंतु आतापर्यंत नवीन दर करार तयार करण्यात आले नसल्याने औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.अधिष्ठात्यांना द्यावेत ४० लाखांपर्यंत औषध खरेदीचे अधिकारमेडिकलच्या अधिष्ठात्यांना महिन्याकाठी २० लाखांपर्यंत औषध खरेदी करण्याचे अधिकार आहेत. परंतु दिवसेंदिवस रुग्णांची वाढती गर्दी, मोठ्या प्रमाणात खासगी इस्पितळांकडून शेवटच्या घटका मोजत येणाऱ्या रुग्णांची संख्या व महागलेल्या जीवनावश्यक औषधांमुळे हा निधी कमी पडतो. हा निधी ४० लाखांपर्यंत वाढवून दिल्यास काही प्रमाणात औषधांचा तुटवडा कमी होईल, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.