शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

ओबीसींच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन

By admin | Updated: July 3, 2014 00:49 IST

ओबीसी विद्यार्थ्यांना दिलेली आश्वासने पाळण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्यामुळे महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांनी येत्या २३ जुलैला शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ बंद आंदोलन करणार

नागपूर :ओबीसी विद्यार्थ्यांना दिलेली आश्वासने पाळण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्यामुळे महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांनी येत्या २३ जुलैला शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी पत्रपरिषदेत दिला. राज्य सरकारने ओबीसींना आरक्षण दिले, मात्र आरक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना होताना दिसत नाही. सरकारने तर ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यासाठी बांठिया समिती नेमली होती. ओबीसी क्रिमीलेयर मर्यादा ६ लाखावरून ४.५० लाख केली. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घटनात्मक जबाबदारी सरकार टाळत होती. यासंदर्भात महात्मा फुले समता परिषदेने २०१३ ला आंदोलन करून, लोकप्रतिनिधींच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यामुळे विधानसभेत यावर लक्षवेधी मांडून सरकारला जाब विचारण्यात आला. तेव्हा महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शिष्यवृत्ती बंद करणारी बांठिया समिती तत्काळ बरखास्त करण्यात येईल, क्रिमीलेयरचा निर्णय एका महिन्यात घेण्यात येईल व विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. दिलेल्या आश्वासनातून केवळ बांठिया समिती तत्काळ बरखास्त झाली. मात्र क्रिमीलेयरची मर्यादा आजही कायम आहे आणि शिष्यवृत्तीही विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही मोघे यांनी शिष्यवृत्तीचे पैसे तत्काळ देऊ, क्रिमीलेयरची मर्यादा वाढवू, असे विधानसभेत सांगितले. यावर अजूनही काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ओबीसी संघटनांनी पुन्हा शाळा बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. (प्रतिनिधी)