शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ऑगस्टपर्यंत सुरू होईल नागपुरातील चिचभवनचा आरओबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 22:04 IST

वर्धा रोडवरील चिचभवन येथील रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी)वरून ऑगस्ट महिन्यात वाहतूक सुरू होणार आहे. येथील रेल्वे ट्रॅकच्या वरच्या भागावर स्टील गर्डर स्थापन करण्याचे काम मंगळवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकवर गर्डर स्थापन करण्याचे काम अतिशय गुंतागुंतीचे होते, त्यामुळे पुलाच्या निर्माणाला वेळ लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरील चिचभवन येथील रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी)वरून ऑगस्ट महिन्यात वाहतूक सुरू होणार आहे. येथील रेल्वे ट्रॅकच्या वरच्या भागावर स्टील गर्डर स्थापन करण्याचे काम मंगळवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकवर गर्डर स्थापन करण्याचे काम अतिशय गुंतागुंतीचे होते, त्यामुळे पुलाच्या निर्माणाला वेळ लागला.रेल्वे ट्रॅकच्या वरच्या भागात गर्डर स्थापित करण्यासाठी ५५ मीटर लांब स्टील गर्डरचे दोन तुकडे कापून जोडावे लागले. ट्रॅकच्या अगदी वरच्या भागात ३३ मीटरचा तुकडा व दुसरा २२ मीटरचा तुकडा आहे. हे गर्डर दोन पिल्लरवर स्थापन करण्यात आले आहे. दोन पिल्लरच्या मधात रेल्वे ट्रॅक असल्याने गर्डरला एकाच क्रेनने उचलणे शक्य होत नव्हते. त्यामुळे एक अन्य क्रेन मुंबईवरून बोलवावी लागली. या डिझाईनसाठी रेल्वेकडून दुसऱ्यांदा मंजुरी घ्यावी लागली होती. आरओबीच्या एका भागाचे काम झाले आहे. तर चिचभवनकडील भागात काम सुरू आहे. याचसोबत सर्व्हिस रोड व नालीचे काम करायचे आहे.सूत्रांकडून सांगण्यात आले की उर्विरत पिल्लरवर दोन आठवड्यात पिल्लर उभे करून काँक्रीट गर्डर लावण्याचे काम पूर्ण केले जाईल. स्टील गर्डरवाल्या भागात काँक्रीट रोड राहील. चिचभवनजवळ अ‍ॅप्रोच रोडसाठी खड्डे खोदण्यात आले आहे. ठेका कंपनीसाठी हे आव्हानात्मक काम आहे. आता पावसाळा लागत असल्याने कामाला गती आली आहे.प्रोजेक्टच्या महत्त्वपूर्ण बाबी१) १.१२ किमी लांब व १३.७ मीटर रुंद आरओबीचे काम २०१७ मध्ये डीपी जैन कंपनीने सुरू केले होते.२) ५० कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला होता.३) पुलाचे बांधकाम २५ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करायचे होते.४) या प्रोजेक्टसाठी सुरुवातीला तीन प्रकारचे डिझाईन मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.५) लॉकडाऊनपूर्वी रेल्वेकडून ब्लॉक मागण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये कामासाठी चांगली संधी मिळाली.६) विमान उड्डाण बंद असल्याने एएआयकडून ब्लॉक मिळविण्यासाठी कुठलीही अडचण आली नाही.ऑगस्टपर्यंत वाट बघाचिचभवन आरओबीचे निर्माण कार्य ऑगस्टमध्ये पूर्ण होईल. त्याच महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल. यासाठी पूर्व रेल्वेकडून काही ब्लॉक घ्यावे लागणार आहे. यासाठी एनएचएआय व रेल्वे समन्वयातून काम करीत आहे.अभिजित जिचकार, प्रोजेक्ट डायरेक्टर, एनएचएआय

टॅग्स :nagpurनागपूर