शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

लालफितशाहीत अडकला भूखंड

By admin | Updated: February 6, 2017 02:06 IST

कोणतेही सबळ कारण नसताना केवळ अतिक्रमणाच्या नावावर तत्कालीन अधिकाऱ्यांनी भिवापूर शहरातील एका गरीब दुकानदाराच्या दुकानावर बुलडोझर चालविला होता.

१४ वर्षांपासून कार्यालयांचे हेलपाटे : अतिक्रमणाच्या नावावर दुकानावर चालविला बुलडोझर शरद मिरे   भिवापूर कोणतेही सबळ कारण नसताना केवळ अतिक्रमणाच्या नावावर तत्कालीन अधिकाऱ्यांनी भिवापूर शहरातील एका गरीब दुकानदाराच्या दुकानावर बुलडोझर चालविला होता. त्यामुळे या दुकानदाराचे उपजीविकेचे हक्काचे साधन हिसकावून घेतल्या गेले. न्याय मिळविण्यासाठी हा दुकानदार १४ वर्षांपासून कधी उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरेड तर कधी भिवापूर येथील तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारत आहे. त्याच्या संघर्षाची दखल घेत प्रशासनाने सदर भूखंड ‘त्या’ दुकानदाराला देण्याचे आदेश दिले. स्थानिक अधिकारी मात्र त्याला भूखंड देण्यास टाळाटाळ करीत आहेत. रामभाऊ पंचम तासकर, रा. भिवापूर असे पीडित दुकानदाराचे नाव आहे. भिवापूर शहरातील पटवारी हलका नंबर ७८ मधील भूखंड क्रमांक १५५ हा रामभाऊ तासकर यांना देण्यासंबधीचा आदेश प्रशासनाने २००९ मध्ये दिला. त्यानंतर प्रशासनाने त्रुटी काढून तासकर यांना हा भूखंड देण्यास नकार दिला. या प्रकरणाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. डझनावर तक्रारी, अर्ज व निवेदने देण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांच्या काळजाला पाझर फुटला नाही. भिवापूर शहरातील धर्मापूर मार्गावरील शासकीय जागेवर रामभाऊ तासकर यांचे ४० वर्षांपूर्वी चप्पल - जोडे विक्रीचे दुकान थाटले होते. हेच त्यांच्या उपजीविकेचे हक्काचे एकमेव साधन होय. २००२ मध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली तासकर यांचे एकमेव दुकान हटविण्यात आले. ही कारवाई हेतुपुरस्सर करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या अन्यायाविरुद्ध तासकर यांनी विभागीय लोकशाही दिनी तक्रार केली. तत्कालीन विभागीय आयुक्त खान व उपजिल्हाधिकारी दिलीप सावरकर यांनी सदर भूखंड रामभाऊ तासकर यांना परत देण्याचा आदेश दिला. या आदेशाच्या अनुषंगाने जाहीरनामा काढण्यात आला. शिवाय, २६ जानेवारी २०१४ रोजी भिवापूर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत विषय क्रमांक २१ नुसार हा भूखंड रामभाऊ तासकर यांना वाणिज्यिक वापरासाठी देण्याबाबत ठराव घेण्यात आला. २००९ मध्ये प्रस्तावित भूखंड हा मंडळ अधिकारी कार्यालयासाठी आरक्षित असल्यामुळे तो इतर कोणत्याही प्रयोजनासाठी वापरण्यापूर्वी प्रथमत: सदरचे आरक्षण काढावे लागेल, असा अभिप्राय देण्यात आला. त्या अनुषंगाने १२ जून २००९ रोजी जाहीरनामा काढून या जागेचे आरक्षण कमी व उजर प्राप्त झाले नव्हते. तेव्हापासून आजवर या भूखंडाचा तिढा कायम आहे. आरक्षण कमी करण्याचा प्रस्ताव या भूखंडावरील आरक्षण कमी करण्याच्या प्रस्तावावरील कार्यवाही अर्धवट असल्याने हा प्रस्ताव त्रुटी पूर्ततेसाठी वारंवार परत पाठविण्यात आला. विशेष म्हणजे २००९ मध्ये तासकर यांना सदर भूखंड देण्यासाठी मूल्यांकन करून स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रही लिहून घेण्यात आले होते. मंडळ अधिकारी यांनी सदर जागेवरील आरक्षण कमी न करण्याचा व अर्जदारास जागा आवंटित न करण्याचा अभिप्राय सादर केला असला तरी तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रशासकीय इमारतीत मंडळ अधिकारी कार्यालय ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी कार्यालयाकरिता या भूखंडाची आवश्यकता नाही, असा अभिप्राय तहसीलदार डी. जी. जाधव यांनी १८ जुलै २०१६ रोजी दिला आहे. सदर आरक्षण कमी करण्याचे प्रस्तावित केले आहे. तरीही हा भूखंड देण्यास विलंब केला जात आहे.