शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

माजी अधिष्ठात्यासह दोघांना ९ पर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: May 8, 2014 02:34 IST

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची जमीन बेकायदेशीररीत्या चिल्लर दुकानदार संघाला देऊन महाघोटाळा केल्याप्रकरणी ..

नागपूर : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची जमीन बेकायदेशीररीत्या चिल्लर दुकानदार संघाला देऊन महाघोटाळा केल्याप्रकरणी या महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठात्यासह दोन जणांना आज भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एम. लालवानी यांच्या न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.सेवानवृत्त असलेले माजी अधिष्ठाता डॉ. एन. एन. इंगळे आणि नवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ. बळीराम तेजराम परशुरामकर, अशी आरोपींची नावे आहेत.या घोटाळ्याप्रकरणी काल भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने या दोघांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (क) (ड), १३ (२) अन्वये अटक केली होती. या प्रकरणात आणखी चार आरोपी असून, त्यांना अटक झालेली नाही. त्यात तत्कालीन प्रपाठक डॉ. प्रमोद वासुदेवराव साळवे, प्राध्यापक डॉ. प्रकाश हिरालाल खापर्डे, डॉ. प्रकाश उत्तमराव देशमुख, नवृत्त प्रपाठक डॉ. राजेंद्र गजाननराव वाघ यांचा समावेश आहे.तपास अधिकारी राजू बहादुरे यांनी डॉ. इंगळे आणि डॉ. परशुरामकर यांना न्यायालयात हजर केले. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, शासनाने १५ एकर जागा शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला दिली होती. या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर फुटपाथवर दुकाने लावणार्‍या नोंदणीकृत आयुर्वेदिक चिल्लर दुकानदार कल्याणकारी संस्थेने या महाविद्यालयाची काही जागा दुकाने उभारण्यासाठीची मागणी शासनाकडे केली होती. त्यावर शासनाने डॉ. इंगळे यांच्या पूर्वीच्या अधिष्ठात्यांना अहवाल मागितला होता. त्यांनी प्रतिकूल अहवाल तयार केला होता. या अहवालाकडे दुर्लक्ष करून इंगळे यांनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करीत तीन सदस्यीय समिती नेमली होती. समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ आणि सदस्य साळवे आणि परशुरामकर होते. या समितीने या दुकानदारांना १७,000 चौरस फूट जागा देण्याची शिफारस आयुर्वेद संचालनालयाकडे केली होती. औषध विक्रीची दुकाने आणि मानवतावादी दृष्टिकोनातून अन्य दुकानांचे पुनर्वसन, अशी भूमिका या समितीने घेतली होती.आयुर्वेद संचालकांनीही सत्य दडवून ठेवून बेकायदेशीरपणे केलेल्या शिफारशींपेक्षा अधिक २१ हजार चौरस फूट जागा या दुकानदार संघटनेला देण्याचा आदेश मंत्रालयाकडून मिळवून घेतला होता. पुढे शासनासोबत कोणताही पत्रव्यवहार न करता ही जागा दुकानदारांना ३0 वर्षांच्या लीजवर देण्यात आली होती.अन् थाटली मांस विक्रीची दुकानेसक्करदरा चौक ते छोटा ताजबागकडे जाणार्‍या मार्गालगतच्या या जागेवर दुकानांच्या ७७ गाळ्यांची मंजुरी असताना १0५ दुकाने उभारण्यात आली होती. नकाशे, बांधकाम मंजुरीही बेकायदेशीर होती. या दुकानांपैकी काही दुकाने आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणार्‍या मांस विक्रीची आणि चप्पल-जोड्यांची होती.दुकानदारांचा आर्थिक फायदा व स्वत: कोट्यवधीचा मलिदा लाटण्यासाठी आरोपींनी मोठे परिश्रम घेऊन शासनाकडे जाणीवपूर्वक खोटा अहवाल पाठवून आपल्या लोकसेवक पदाचा गैरवापर केला.या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करणे आहे, या आरोपींव्यतिरिक्त आणखी कुणाचा या घोटाळ्यात सहभाग आहे काय, याबाबतचा सखोल तपास करणे आहे. तत्कालीन आयुर्वेद संचालक आणि उपसचिवांची विचारपूस करणे आहे, आदी मुद्यांवर तपास अधिकार्‍याने आरोपींचा १३ मे पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळावा, अशी विनंती केली. आरोपींच्या वकिलांनी मात्र या पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अजय लांबट तर आरोपींच्या वतीने अँड. प्रफुल्ल मोहगावकर, अँड. रोशन बागडे आणि अँड. पराग वाघ यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)