शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२०६० मध्ये ओझाेन थर गाठणार १९८० ची पातळी; पण धाेका टळलेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 07:45 IST

Nagpur News सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करणारा ओझाेन थर आता सुरक्षित हाेत आहे.

ठळक मुद्दे२४ दशलक्ष चाैकिमीपर्यंत पडला हाेता खड्डा

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करणारा ओझाेन थर आता सुरक्षित हाेत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५० किमीच्या वर असणाऱ्या ओझाेन थराला क्लाेराेफ्लुराेकाॅर्बन (सीएफसी) आणि तत्सम प्रदूषित घटकांमुळे माेठा खड्डा पडला हाेता. विकसित देशांनी १९८५ पासून सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे हा खड्डा भरत आल्याचे डिसेंबर २०२० मध्ये जाहीर करण्यात आले. जगभरातील देशांच्या सर्वसमावेशी प्रयत्नांमुळे २०६० मध्ये ओझाेनचा थर १९८० मध्ये असलेली स्थिती गाठेल, असा समाधानकारक विश्वास जागतिक संघटनेकडून व्यक्त केला जात आहे.

अंटार्क्टिकाच्या प्रदेशात ओझाेन थराला २४ दशलक्ष चाैरसकिमीपर्यंत भगदाड पडले हाेते व ते विस्तारले हाेते. यामुळे या प्रदेशामध्ये प्रचंड तापमान वाढ हाेणे सुरू झाले हाेते. यानंतर रशिया, अमेरिका व खाली ऑस्ट्रेलिया खंडातील देशांना माेठा धाेका निर्माण हाेणार हाेता. हा धाेका लक्षात घेता ओझाेनला धाेका पाेहचविणारे प्रदूषके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, यामध्ये १९७ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. यालाच १९८६ चे ‘माेन्टरियल प्राेटाेकाॅल’ म्हणतात. याअंतर्गत ओझाेन थराला धाेका पाेहचविणारे सीएफसी, हॅलाेन्स, मिथिल ब्राेमाईड आदी प्रदूषकांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रेफ्रीजरेटर्स, एसी, ऑटाे एसी, साॅल्व्हन्ट, एअरसाेल आदी वस्तूंमध्ये सीएफसीऐवजी पर्यायी रसायनांच्या उपयाेगावर भर देण्यात आला. यानंतर रेफ्रीजरेटर्समध्ये हायड्राेक्लाेराेफ्लुराेकार्बन (एचसीएफसी) व हायड्राेफ्लुराेकार्बन (एचएफसी)चा उपयाेग करण्याचे ठरविण्यात आले. पुढे १९९२ साली माेन्टरियल प्राेटाेकाॅलमध्ये सुधारणा करून एचसीएफसी व एचएफसीच्या उपयाेगावरही बंधने घालण्यात आली. या प्रयत्नांमुळेच आता ओझाेन थर सुरक्षित स्तर गाठत आहे.

काय हाेती स्थिती

- १९८० च्या दशकात सीएफसी-१२ चे उत्पादन ४.२५ लाख टनापर्यंत गेले हाेते. सीएफसी-११ चे ३.५० लाख टन तर सीएफसी-११३ चे उत्पादन २.४० लाख टनापर्यंत हाेते.

- १९८६ मध्ये सीएफसी फेजऑऊट करून २००० सालापर्यंत उत्पादन व वापर २५ हजार टनापर्यंत खाली आणण्यात आला.

- पर्याय म्हणून वापर हाेणाऱ्या एचसीएफसी व एचएफसीच्या वापरावरही बंधने घालण्यात आली.

- विकसित देशांना २०२० पर्यंत एचसीएफसी फेजआऊट करण्याचे व विकसनशील देशांना २०३० चे लक्ष्य देण्यात आले.

- हॅलाेन्सवर बंदीसाठी विकसित देश १९९३ तर विकसनशील देशांना २०१० ची मुदत.

- मिथिल ब्राेमाईडला विकसित देश २००५ व विकसनशील देशांना २०१५ पर्यंत फेजआऊट करायचे हाेते.

टॅग्स :Earthपृथ्वी