शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लंग इन्स्टिट्यूट

By admin | Updated: March 4, 2017 01:46 IST

वाढते प्रदूषण व धूम्रपानाच्या सवयीमुळे शहरांमध्ये फुफ्फुसाच्या आजारांचा फास आवळत आहे.

देशातील पहिले : मेडिकलने घेतला पुढाकार, २३ विभागांसह १९५ खाटांचे केंद्र सुमेध वाघमारे   नागपूर वाढते प्रदूषण व धूम्रपानाच्या सवयीमुळे शहरांमध्ये फुफ्फुसाच्या आजारांचा फास आवळत आहे. यातून केवळ अस्थमाच नव्हे तर फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे. याला गंभीरतेने घेत नागपूर मेडिकलने ‘लंग इन्स्टिट्यूट’चा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे. यात लहान मुलांच्या श्वसन रोग विभागापासून ते मोठ्यांच्या छातीच्या शस्त्रक्रिया असे २३ विभाग असणार आहेत. देशातील १९५ खाटांचे हे पहिले केंद्र ठरणार आहे. फुफ्फुसाच्या रुग्णांसाठी आशेचे किरण ठरणार मेडिकलमध्ये विदर्भासह छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश येथून रुग्ण येतात. यामुळे हे ‘लंग इन्स्टिट्यूट’ मध्यभारतातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. येथे सर्वसमावेशक सेवा तर उपलब्ध होईल सोबतच संशोधनाला प्रोत्साहन देऊन जगात हे संशोधन प्रसिद्ध केले जाणार आहे. टीबी वॉर्ड परिसरात असणार हे केंद्र मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात साधारण २५ एकर परिसरात ‘लंग इन्स्टिट्यूट’ प्रस्तावित आहे. यात ६० खाटांचा श्वसन विभाग, ६० खाटांचा क्षयरोग विभाग, १० खाटांचा ‘आॅबस्ट्रॅक्टिव्ह एअरवे डिसीज’, पाच खाटांचा ‘इन्टरस्टीशिअल लंग डिसीज’, पाच खाटांचा निद्रा विकार, पाच खाटांचा इंटरव्हेंशनल पल्मोनरीलॉजी’, १० खाटांचा ‘इन्टरमेडिएट रेस्पीरेटरी केअर युनिट’ २० खाटांचा ‘छाती शस्त्रक्रियेचा विभाग’, तर १० खाटांचा ‘पेडियाट्रीक पल्मोनोलॉजी’ अशा २३ विभागांसह त्याच्या सब विभागांचा समावेश यात असणार आहे. ६०० कोटीचा प्रकल्प या इन्स्टिट्यूटच्या मंजुरीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय आरोग्यसेवेचे अतिरिक्त महासंचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी पुढाकार घेतला आहे. याला मंजुरी मिळाल्यास केंद्र शासन साधारण ६०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. शिवाय १७ प्राध्यापक, २९ सहयोगी प्राध्यापक, ३४ सहायक प्राध्यापक, ३१ वरिष्ठ निवासी डॉक्टर, ६७ कनिष्ठ निवासी डॉक्टर सेवेत असणार आहेत.