शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

३ हजारावर ग्राहकांना महावितरणचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोमवारपासून महावितरणने या थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरु केली आहे. महावितरणतर्फे मागील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सोमवारपासून महावितरणने या थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरु केली आहे. महावितरणतर्फे मागील पाच दिवसात तीन हजाराहून अधिक थकबाकीदारांचे कनेक्शन कापले आहे. ही कारवाई सुरू केल्यानंतर ग्रामीणमधील ११३५ व शहरातील ३७५१ ग्राहकांनी बिल भरले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ८८२ ग्राहकांनी एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत वीज बिल भरलेलेच नाही. या ग्राहकांवर २२०.४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. आता थकबाकीदारांना महावितरण शॉक देण्याच्या तयारीत आहे.

महावितरणचे जिल्ह्यात दोन सर्कल आहेत. शहर सर्कलमध्ये नागपूर शहर व हिंगणा-बुटीबोरी यांचा समावेश होतो. तर उर्वरित जिल्हा ग्रामीण सर्कलमध्ये येतो. कोरोनाचा प्रादुर्भााव वाढला तेव्हापासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर वीज बिल भरणे बंद केले होते. ग्रामीणमध्ये ५७,४९३ ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत वीज बिल भरलेले नाही. त्यांच्यावर ५० कोटी ५३ लाख रुपयाची थकबाकी आहे. गेल्या पाच दिवसात ११३५ कनेक्शन कापण्यात आले आहे. दुसरीकडे महावितरणच्या आवाहनानंतर ५३५८ थकबाकीदारांनी ३.७७ कोटी रुपयाचे बिल भरून स्वत:ची कारवाई होण्यापासून सुटका करून घेतली.

शहर सर्कलचा विचार केला तर गुरुवारपर्यंत १६१६ कनेक्शन कापण्यात आले आहे. शुक्रवारी सुद्धा २५० कनेक्शन कापण्यात आले. या सर्कलमध्ये ८१,३८९ ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून बिल भरलेले नाही. या ग्राहकांवर १६९.९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या चार दिवसात थकबाकीदारांनी ३ कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम भरून कारवाईपासून सुटका करून घेतली.

बॉक्स

सर्वाधिक थकबाकी सिव्हील लाईन्समध्ये, सर्वाधिक कारवाई काँग्रेसनगरमध्ये

शहर सर्कलचा विचार केला तर पाच डिव्हीजनमध्ये सर्वाधिक ५९.०२ कोटी रुपयांची थकबाकी सिव्हील लाईन्स डिव्हीजनची आहे. त्याचप्रकारे बुटीबोरीमध्ये ७.४ कोटी, काँग्रेसनगरमध्ये १६.५७ कोटी, गांधीबागमध्ये ३४.०१ कोटी व महाल डिव्हीजनमध्ये ५२.७९ कोटी रुपयाची थकबाकी आहे. परंतु कारवाईमध्ये मात्र काँग्रेसनगर पुढे आहे. येथे आतापर्यंत ६३७ थकबाकीदारांचे कनेक्शन कापण्यात आले. त्याचप्रकारे बुटीबोरीमध्ये १५८, सिव्हील लाईन्समध्ये ३८७, गांधीबागमध्ये ७२ व महाल डिव्हीजनमध्ये ३६२ वीज कनेक्शन कापण्यात आले आहे.