लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगण्याचा आधार असलेल्या तरुण मुलाचे निधन झाल्यामुळे मुलाच्या विरहात अस्वस्थ झालेल्या मातेने विष प्राशन करून आत्महत्या केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा परिसरात ही करुण घटना घडली. जयमाला देवदास पालेकर (वय ६३) असे मृत महिलेचे नाव आहे.जयताळ्यातील शारदानगरात पालेकर परिवार राहत होता. या परिवाराचे प्रमुख देवदास पालेकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे जयमाला यांनी आपल्या दोन मुलांना कसेबसे वाढवले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लहान मुलाचे निधन झाले. त्यामुळे जयमाला यांचे विश्व राकेश नामक (वय अंदाजे २० ते २५ वर्षे) मुलातच सामावले होते. तोच त्यांच्या जगण्याचा आधार होता. गेल्या आठवड्यात त्याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी राकेशला आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांना कल्पना दिली. १६ मे रोजी नातेवाईकांनी जयमाला यांना राकेशचे काही खरे नाही, असे सांगितले. ते ऐकून जयमाला कमालीच्या अस्वस्थ झाल्या. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास त्या विषारी फिनाईल पिऊन हॉस्पिटलमध्ये पोहचल्या. तिकडे राकेशचा मृत्यू झाला तर हॉस्पिटल परिसरात जयमाला बेशुद्ध होऊन पडल्या. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. त्यांनी विष घेतल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. खासगी इस्पितळात उपचार करण्याएवढी आर्थिक स्थिती चांगली नसल्याने जयमाला यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास जयमाला यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे जयताळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बजाजनगरचे हवालदार मेघराज चरडे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात मुलाच्या विरहात आईची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:38 IST
जगण्याचा आधार असलेल्या तरुण मुलाचे निधन झाल्यामुळे मुलाच्या विरहात अस्वस्थ झालेल्या मातेने विष प्राशन करून आत्महत्या केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा परिसरात ही करुण घटना घडली. जयमाला देवदास पालेकर (वय ६३) असे मृत महिलेचे नाव आहे.
नागपुरात मुलाच्या विरहात आईची आत्महत्या
ठळक मुद्देजयताळ्यातील घटना : परिसरात हळहळ