शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

विदर्भ समजून घेण्याची ‘मनसे’ परंपरा खंडित

By admin | Updated: December 7, 2014 00:29 IST

गत पाच वर्षांत हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये दाखल होऊन विदर्भाच्या प्रश्नांची चर्चा करण्याची मनसे आमदारांची परंपरा यंदा मोडली गेली आहे. पक्षाचा एकच आमदार असणे हे यामागचे

नागपूर : गत पाच वर्षांत हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये दाखल होऊन विदर्भाच्या प्रश्नांची चर्चा करण्याची मनसे आमदारांची परंपरा यंदा मोडली गेली आहे. पक्षाचा एकच आमदार असणे हे यामागचे कारण मानले जाते.नागपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनाच्या निमित्ताने या भागातील प्रमुख प्रश्नांची मांडणी विधानसभेत करता यावी म्हणून ते समजून घेण्यासाठी मनसेचे तत्कालीन गट नेते बाळा नांदगावकर व त्यांचे सहकारी आमदार दोन दिवसापूर्वी नागपूरमध्ये दाखल होत असत. पत्रकारांशीही ते संवाद साधत होते. पाच वर्षे ही परंपरा कायम होती. विदर्भातील अनेक प्रश्नही मनसेच्या आमदारांनी विधानसभेत मांडले होते. त्याचा पाठपुरावाही केला होता. २०१४ च्या निवडणुकीत मनसेचे संख्याबळ केवळ एकवर स्थिरावले. ते सदस्यही प्रथमच निवडून आले. त्यामुळे यंदा मनसेला ही परंपरा पुढे चालू ठेवता आली नाही. यासंदर्भात मनसेचे विदर्भ प्रदेश संघटक हेमंत गडकरी म्हणाले की, बाळा नांदगावकर यांना विधिमंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यामुळे ते येथे येऊन प्रश्न समजून घेत होते. आता शरद सोनवणे हे मनसेचे एकमेव सदस्य आहेत. त्यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विकासाच्या मुद्यावर सभागृहात प्रश्न मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ते सभागृहात प्रश्न मांडतील. (प्रतिनिधी)विशाल बरबटे यांचा राजीनामामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष (मध्य, पूर्व आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघ) विशाल बरबटे यांनी त्यांच्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक जबाबदारीमुळे पक्षाला वेळ देऊ शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.