शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

म. गांधीजी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते

By admin | Updated: February 1, 2015 00:57 IST

महात्मा गांधी यांचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर फक्त या देशाचे राष्ट्रपिता आणि खादीचा प्रसार करणारे, स्वदेशी आंदोलन उभारणारे राष्ट्रभक्त अशीच काहीशी प्रतिमा निर्माण होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधीजींची पुण्यतिथी : प्रार्थनासभा आणि चर्चासत्र नागपूर : महात्मा गांधी यांचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर फक्त या देशाचे राष्ट्रपिता आणि खादीचा प्रसार करणारे, स्वदेशी आंदोलन उभारणारे राष्ट्रभक्त अशीच काहीशी प्रतिमा निर्माण होते. त्यात काहीही गैर नाहीच पण यापलिकडेही गांधींजींचे व्यक्तिमत्त्व फारच समृद्ध होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाच ते माहीत आहे. त्यावर फारसे लिहिले गेले नाही आणि त्याची चर्चाही झाली नाही. देशाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणारा हा नेता बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी होता. कलांवर प्रेम करणारे, रागसंगीताचे ज्ञान असणारे, अध्यात्माची ताकद असणारे आणि तरीही मिश्किल, विनोदी स्वभावाचे गांधीजी होते, अशी आठवण त्यांच्यासह प्रत्यक्ष काम केलेले स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय बरगी गुरुजी यांनी सांगितली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रार्थनासभा आणि बंधूता विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गांधींजींच्या अनेक आठवणी बरगे गुरुजी यांनी सांगितल्या. गांधींजींच्या व्यक्तिमत्त्वाचे हे नवे पैलू नव्या पिढीसाठी नवीन होते. त्यामुळे या कार्यक्रमात कुतूहल निर्माण झाले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून म्यूर मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक विलास शेंडे, कोळसा कामगार नेते माजी आ. एस. क्यू. जामा, सर्वोदयी विचारवंत प्राचार्य आत्माराम उखळकर, गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील उपस्थित होते. गांधीजी रोज प्रार्थनासभा घेत आणि त्यानंतर उपस्थितांशी चिंतनपर संवाद करीत. यातूनच देशाच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधली.एस. क्यू. जामा म्हणाले, महात्मा गांधी हे नाव नाही तर एक विचार आहे. त्यांनी सर्व धर्मांना सोबत घेऊन या देशासाठी लढाई केली. आज त्यांच्या विचाराची गरज केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे आणि त्यांचे विचार जगाला भुरळ घालत आहेत. त्याचा प्रत्ययही आपल्याला येतो. प्राचार्य आत्माराम उखळकर म्हणाले, गांधीजींनी त्यांच्या हिंद स्वराज पुस्तकात या देशाच्या प्रगतीचा मार्ग लिहून ठेवला आहे. त्याच विचारांनी त्यांनी आयुष्यभर कार्य केले पण आपण त्यांच्या विचारांवर राज्य चालविले नाही. अन्यथा देशाचे आजचे चित्र वेगळे राहिले असते. औद्योगिकीकरणापूर्वी ग्रामीण भारताचा विकास साधण्याचे त्यांचे तंत्र होते. पंचवार्षिक योजना ग्रामीण विकासासाठी राबविल्या असत्या तर शेतकरी आणि ग्रामीण भारत स्वयंपूर्ण झाला असता. त्यानंतर उद्योग उभारणी करता आली असती. पण औद्योगिक धोरण राबविल्याने आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. विलास शेंडे यांनी प्रार्थना आणि बंधूता या विषयावर मत व्यक्त करताना गांधीजींच्या प्रार्थनेचे महत्त्व विशद केले. ते सर्वच धर्मांच्या प्रार्थना करीत होते. प्रार्थनेतून बंधूता आपोआप निर्माण होते, असे ते म्हणाले. सर्वोदयी विचारवंत देशपांडे गुरुजी यांनी सर्वधर्म प्रार्थना विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. गांधीजींच्या प्रार्थनासभेची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. त्यांच्या प्रार्थनासभेत सर्व धर्मांचे लोक सहभागी होत होते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन गांधी विचार प्रसारक रवी गुडधे यांनी केले. (प्रतिनिधी)