शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

जयभीमने दुमदुमली दी क्षा भू मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:55 IST

होता अंधार युगाचा, आमच्या पावलोपावली...धम्माच्या क्षितिजावर भीम झाला सूर्याची सावली...असे भीमस्तूतीचे गीत ओठांवर सजवून...पंचशीलाची पताका खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात ....

ठळक मुद्देअनुयायांची शिस्तबद्धता वाखाणण्याजोगी : उत्साह आणि आनंदाचे पर्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होता अंधार युगाचा, आमच्या पावलोपावली...धम्माच्या क्षितिजावर भीम झाला सूर्याची सावली...असे भीमस्तूतीचे गीत ओठांवर सजवून...पंचशीलाची पताका खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळया पाखरांचे काफिले दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र रविवारी पहाटेपर्यंत अविरत सुरूच होते. दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले होते. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता, तो येथील माती मस्तकाला लावण्यासाठी, नवीन ऊर्जा घेण्यासाठी...डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होण्यासाठी. डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराने अख्खा परिसर दुमदुमूत होता. स्तूपातील बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे स्वयंसेवक जागोजागी मदतीसाठी उभे होते. धम्मचक्र प्रवर्तनदिनाचे एक खास आकर्षण म्हणजे त्यानिमित्त इथे भरणारे पुस्तक प्रदर्शन. लाखो पुस्तके, मासिके, विशेषांक विकल्या गेली. केवळ आंबेडकरी जनताच नव्हे तर समाजातील सर्व स्तरांतील, जातीधर्मांच्या लोकांनी पुस्तके खरेदी करण्यासाठी दीक्षाभूमीवर गर्दी केली होती. हजारो मैलावरून लाखोंच्या संख्येने आलेल्या भीमसैनिकांच्या जनसागराला सेवा देण्यासाठी पाचशेवर संघटना सरसावल्या होत्या. आरोग्यापासून ते भोजनदानाची चोख व्यवस्था उपलब्ध होती.दक्षिण भारतातून आलं ‘निळं वादळ’दक्षिण भारतातून यावर्षी मोठ्या संख्येत आंबेडकरी अनुयायी आले. कर्नाटक येथून ५०० वर अनुयायी शासकीय बस करून आले होते, तर काही रेल्वेने आले होते. विशेष म्हणजे, काँग्रेसनगर चौक मार्गावर त्यांनी आपल्या बसेस उभ्या केल्या होत्या. येथून दीक्षाभूमीपर्यंत त्यांनी रॅली काढली होती. रॅलीत पारंपरिक वेशभूषेत हे भीम सैनिक सहभागी झाले होते. सामूहिक डफ वाजवीत जयभीमच्या घोषात निघालेल्या या रॅलीने अनेकांचे लक्ष वेधले.कर्नाटकातून एकटाच आला ८५ वर्षांचा ‘तरुण’देशाच्या कानाकोपºयाच्या खेड्यापाड्यांमधून हजारो आंबेडकर अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात. यात मल्लप्पा हन्नेफेरी या ८५ वर्षीय भीम सैनिकाचाही समावेश होता. डोक्यावर पगडी, अंगावर कोट, कमरेला धोतर, हातात काठी आणि डोक्यावर पुस्तक, भाकरी आणि चादरीचे गाठोडं घेऊन ते आले होते. तरुणाला लाजवेल असा त्यांचा रुबाब होता. त्यांना बोलते केल्यावर तुटक्या-फुटक्या हिंदीत ते म्हणाले ‘भीम को वंदन करने हर साल आता हूं’.बौद्ध लेणी संवर्धनासाठी धडपडहजारो वर्षांपासून भारत आणि भारताबाहेरही अस्तित्वात असलेल्या लेण्या, स्तूप, शिलालेख हे शाश्वत बौद्ध धम्माचे जिवंत प्रतीक आहेत. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या प्रतिकांचा इतिहास बाहेर काढणे व त्याच्या संवर्धनासाठी धडपड आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. परम आनंद यांच्या नेतृत्वात भारत लेणी संवर्धन समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. याअंतर्गत धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ््यादरम्यान स्टॉल लावून लोकांमध्ये याबाबत जनजागृती समितीतर्फे केली जात आहे. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करताना बौद्ध धम्माचे अस्तित्व चिरंतन राहावे या उद्देशाने बौद्ध लेण्या, स्तूप, विहारे, शिलालेख अशा प्रतीकांची उभारणी केली. त्यांच्या पुढाकाराने म्यानमारपासून अरब देश आणि युरोपपर्यंत ८४ हजार स्तूप, विहारे आणि अनेक लेण्या व शिलालेख निर्माण झाले. मात्र भारतातील या प्रतीकांची अवस्था वाईट आहे आणि अफगाणिस्तान व इतर अरब देशात या प्रतिकांना नष्ट करण्यात येत आहे. या प्रतीकांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असे मनोगत डॉ. परम आनंद यांनी लोकमशी बोलताना व्यक्त केले. ही बौद्ध स्मारके बुद्ध धम्माच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष पटविणारी आहेत. ही अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत आणि स्वाभिमानाचेही प्रतीक आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक महत्त्वाच्या स्मारकांचा इतिहास बाहेर काढणे बौद्धांची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. त्यासाठी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेतर्फे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेतर्फे सुनील शेंडे, सत्यजित चंद्रीकापुरे, अजय मानवटकर, चंदा शेंडे आदींचा सहभाग आहे.पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी केले मार्गदर्शनपदवीचे शिक्षण झाल्यानंतर पुढे काय करावे, कोणत्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास फायदा होईल, त्यातील अडचणी, अभ्यासक्रम याविषयी विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांना फार कमी माहीत राहते. याचा फायदा काही संस्था घेऊन त्यांना लुबाडतातही. याचा प्रत्यय अनेक विद्यार्थ्यांना आला. हे थांबावे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी १९८१ मध्ये राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी एका संघटना तयार केली. ही संघटना दरवर्षी दीक्षाभूमीवर येणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना’ त्या संघटनेचे नाव. संघटनेचे राहुल कांबळे यांनी सांगितले, हे मार्गदर्शन शिबिर नव्हे तर एका मित्राने दुसºया मित्राला केलेली ही मदत होय. या मैत्रित्वाच्या भावनेमुळे समोरील मित्राला लवकर पटते. या शिवाय आम्ही त्यांचा आणि आमचा मोबाईल नंबर त्यांना देतो. यामुळे आम्ही त्यांच्या संपर्कात राहतो. त्यांच्या अडीअडचणी सोडवतो. या संघटनेचे अध्यक्ष समीर महाजन, कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रतीक बनकर, सचिव आशिष तितरे, भूषण वाघमारे यासारखे अनेक विद्यार्थी यासाठी मदत करतात.तरुणांना बाबासाहेबांच्या पुस्तकांची ओढशिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते पिल्यानंतर प्रत्येकजण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा सल्ला बाबासाहेबांनी अनुयायांना दिला. यातून अनेक उच्चविद्याविभूषित घडले. जातिव्यवस्थेची पोलादी चौकट झुगारून नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा बाबासाहेबांनी दीक्षाभूमीतून दिली. हा इतिहास नव्या पिढीतील युवकांना कळावा, त्यांना यातून प्रेरणा मिळावी म्हणून दरवर्षी दीक्षाभूमीवर पुस्तकांचे स्टॉल्स लावले जातात. पुस्तकांच्या स्टॉलजवळ जाणारा प्रत्येक आंबेडकरी अनुयायी तीन-चार पुस्तके विकत घेतल्याशिवाय घराकडे जात नाही. गेल्या तीन दिवसांपासून हे चित्र दीक्षाभूमीवरील प्रत्येक पुस्तकांच्या स्टॉल्सवर दिसून येत होते. विशेष म्हणजे, रविवारी दीक्षाभूमीवर सकाळी समूहाने आलेला तरुण वर्ग पुस्तक विकत घेताना दिसला. सुगत प्रकाशनाचे अभिनव पगारे यांनी सांगितले, दिवसेंदिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांची मागणी वाढली असून नवीन पिढीतील तसेच आंबेडकरी समाजाव्यतिरिक्त इतर समाजातील वाचकांची संख्या सतत वाढत आहे. हे एक चांगले चित्र आहे. या वर्षी ‘पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘बुद्ध धम्म जिज्ञासा’, ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’, मराठीतील ‘त्रिपिटक’ या सारख्या पुस्तकांचा खप वाढला.