शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

विदर्भात मान्सून उशिरा पोहचण्याचे संकेत

By admin | Updated: May 15, 2014 02:25 IST

मे महिना चांगला तापला तर मान्सून वेळेत येण्याची शक्यता असते. परंतु यावेळी मे महिन्यात

नागपूर :

मे महिना चांगला तापला तर मान्सून वेळेत येण्याची शक्यता असते. परंतु यावेळी मे महिन्यात तापमान ४४ अंशाच्या पुढे गेलेले नाही. त्यामुळे यंदा मान्सून विदर्भात उशिरा पोहचण्याचे संकेत आहे. यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वी वर्तविला आहे. गेल्या वर्षी २३ मे रोजी तापमानाचा उच्चांक गाठला होता. नागपूर शहरात ४७.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. सलग २४ दिवस तापमान ४४ अंशाच्या पुढे होते. त्यामुळे मान्सूनचे लवकर आगमन झाले होते. पावसाळा चांगला झाला होता. २०११ या वर्षान तीन दिवस तर २००४ मध्ये ५ दिवस तापमान ४४ अंशाच्या पुढे होते.

मात्र यावर्षी मे महिन्यातील तापमान अद्याप ४४ अंश सेल्सियसच्या पुढे गेलेले नाही. दरवर्षी विदर्भात मान्सून १० जूनच्या आसपास दाखल होतो. परंतु यंदा तो १५ दिवस उशिरा पोहचण्याची चिन्हे आहेत. नोंदीनुसार ४ मे १९१७ रोजी सर्वात कमी १९.४ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले होते. मागील काही दिवसापासून विदर्भात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्या सरी आल्या. १.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तापमान ३९.२ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. अमरावती ४१.२ व ब्रम्हपुरी येथे ४१.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील इतर जिल्ह्यात तापमान ४०अंश सेल्सियसच्या खालीच होते. (प्रतिनिधी)