शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये प्रत्येक मंत्री ५० कम्युनिस्टांना पेन्शन मिळवून देतो; राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 11:08 IST

''जनतेच्या पैशाचा होतोय दुरुपयोग''

विकास मिश्र

नागपूर : केरळमध्ये प्रत्येक मंत्री आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कम्युनिस्ट पार्टीच्या कमीत कमी ५० कार्यकर्त्यांना पेन्शनधारक बनवितो. जनतेच्या पैशाचा हा दुरुपयोगच आहे, असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी व्यक्त केले.

नागपूर भेटीदरम्यान राज्यपाल खान यांनी ‘लोकमत’शी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. चर्चेदरम्यान ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. राज्यपाल खान म्हणाले, केरळमध्ये असा नियम तयार करण्यात आला आहे की, मंत्र्याच्या कार्यालयात नियुक्त व्यक्तीने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला तर तो पेन्शनसाठी पात्र ठरतो. मंत्री आपल्या मर्जीने स्टाफमध्ये पंचवीस लोकांची नियुक्ती करून घेतात. स्वाभाविकपणे कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांचीच नियुक्ती केली जाते. दोन वर्षे पूर्ण होताच स्टाफ बदलला जातो व त्यांच्या जागी पुन्हा नव्या २५ कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाते. अशा प्रकारे प्रत्येक मंत्री किमान ५० कार्यकर्त्यांना पेन्शनचा लाभार्थी बनवून जातो. सैन्यात कार्यरत जवानांना पेन्शन मिळविण्यासाठी कमीत कमी १० वर्षांची सेवा पूर्ण करावी लागते. मात्र, केरळमध्ये अजब कारभार सुरू आहे. त्यामुळे केरळमध्ये काय सुरू आहे, हे जनतेसमोर मांडणे माझी जबाबदारी आहे व मी ती पार पाडत आहे.

प्रश्न : राज्यपालांवर तीव्र टीका करणाऱ्या मंत्र्यांना बरखास्त करण्याचा इशारा आपण कोणत्या आधारावर दिला ? असा अधिकार राज्यपालांना आहे का ?

राज्यपाल : मी मंत्र्यांना बरखास्त करण्याबाबत बोललो नाही. माझे वक्तव्य इंग्रजीत आहे व मी ‘विड्रवल ऑफ प्लेजर’ शब्दाचा उपयोग केला आहे. याचा अर्थ बरखास्त करणे असा होत नाही. कुणाला इंग्रजी कळत नसेल तर मी काय करू. पदावर राहून राज्याच्या प्रमुखावर प्रखर टीका करता येत नाही. आता मुख्यमंत्र्यांना यावर विचार करायचा आहे की, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवायचे की नाही.

प्रश्न : आपण केरळ विद्यापीठातील सिनेटच्या १५ सदस्यांना का बरखास्त केले ?

राज्यपाल : ते सिनेट सदस्य चुकीच्या मार्गाचा वापर करत होते. मी त्यांना रोखले तर त्यांनी कायदा बदलला. यूजीसी अध्यादेशानुसार कुलगुरूंची नियुक्ती करणाऱ्या सिलेक्शन कमिटीमध्ये राज्यपाल, यूजीसीचा एक प्रतिनिधी व विद्यापीठातील एक नामांकित प्रतिनिधीचा समावेश असावा. या कमिटीने सूचविलेल्या नावांपैकी एकाची राज्यपाल कुलगुरूपदी नियुक्ती करतात; पण केरळमध्ये विधानसभेत असा ठराव पारित करून घेण्यात आला की पॅनलच्या बहुमताच्या आधारावर निर्णय होणार. सिलेक्शन कमिटीमध्ये सरकारचे तीन सदस्य समाविष्ट करण्यात आले. त्यावर मी माझे मत मांडले की, कायदा करून तुम्ही थेट राज्यपाल व्हा, माझा आक्षेप नाही; पण नियमांमध्ये घोळ चालणार नाही.

प्रश्न : राज्य सरकारशी मतभेद का ?

राज्यपाल : राज्यपालांच्या शपथीचे दोन भाग आहेत. पहिले संविधानाचे रक्षण करणे व दुसरे राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी काम करणे. केरळच्या लोकांना फटका बसेल अशी कुठलीही बाब असेल तर मी त्यावर नक्कीच आक्षेप घेईल. मी आरएसएसचे कार्यालय चालवतोय, असा आरोप केला जातो. यावर माझे त्यांना आव्हान आहे की, असा एक व्यक्ती दाखवा की जो आरएसएसशी संबंधित आहे व त्याची नियुक्ती मी केली आहे. राज्यपाल व सरकार यांच्यात यापूर्वीही मतभेद होत राहिले आहेत.

प्रश्न : गोल्ड स्मगलिंगचे प्रकरण काय होते ?

राज्यपाल : मला असे वाटते की गोल्ड स्मगलिंग प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयातील बहुतांश लोक सहभागी होते. मुख्यमंत्र्यांचा मात्र सहभाग नव्हता. आता यात केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप का केला नाही, हे माहीत नाही !

प्रश्न : हिजाबबाबत आपले मत इस्लामिक मान्यतावाल्या लोकांपेक्षा वेगळे का आहे ? दुसऱ्या धर्मातील लोकांनाही अधिकार आहे ?

राज्यपाल : जे हिजाबच्या बाजूने बोलतात तेदेखील हे अत्यावश्यक नसल्याचे सांगतात. इराणमध्ये बघा काय होत आहे. जिथवर शिखांचा प्रश्न आहे तर त्याचा संविधानात उल्लेख आहे. कलम २५ मध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांना संविधानाने हा अधिकार मिळाला आहे.

प्रश्न : काँग्रेसच्या निवडणुकीबाबत आपले मत काय आहे ?

राज्यपाल : कमीत कमी निवडणुका तर झाल्या. आपल्या देशात लोकशाही आहे; पण पक्षांमध्ये लोकशाही नाही. काँग्रेसमध्ये याची सुरुवात तर झाली. भाजप वगळता सर्वच पक्ष कौटुंबिक आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :PoliticsराजकारणKeralaकेरळnagpurनागपूरLokmatलोकमत