शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

ज्या राष्ट्राचे आरोग्य ठीक नाही, त्याची जीडीपी कशी ठीक राहील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन, नियंत्रण, समर्पण व संयम अत्यंत आवश्यक आहे. याच जोरावर कोरोनाच नाही तर कोणत्याही मोठ्यात ...

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन, नियंत्रण, समर्पण व संयम अत्यंत आवश्यक आहे. याच जोरावर कोरोनाच नाही तर कोणत्याही मोठ्यात मोठ्या संकटावर मात करता येते. कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या मृत्यूमागे नियोजनाचा अभाव हे प्रमुख कारण होते. नियोजनाचा अभाव व भीतीमुळे स्थिती या स्तरापर्यंत पोहोचली.

सरकारला खडे बोल

दर्डा यांनी राज्य सरकारला कठोर प्रश्न विचारले. एखाद्या खासगी रुग्णालयात दुर्घटना घडली तर तेथील डॉक्टर, संचालक व स्टॉफवर कारवाई केली जाते. त्यांना पोलिसांकडून तत्काळ अटक होते. मात्र शासकीय रुग्णालयात काही झाल्यास दुर्लक्ष केले जाते. असे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी भंडारा, मुंबई व नाशिक येथील घटनांचा उल्लेख केला. देश एक आहे. लोक एक आहेत.

हसत राहा, हसवत राहा

दर्डा म्हणाले, या काळात आपण सर्वांनी हास्य विसरल्यासारखे वाटते आहे. मात्र आपल्या सर्वांना हसत राहण्याची गरज आहे. आपल्याला हसविणारा दुसरा कुणी नाही तर आपला मित्र असतो, ज्याच्याशी आपण दिलखुलास बोलू शकतो. बेधडक त्याच्याशी काही बोलता येते. हसत व हसवत राहिल्याने मेंदूचे केमिकल बदलून जाते.

समाजाचे कार्य प्रेरणादायी

दर्डा यांनी जैन समाजाच्या या सेवाभावी संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली. संघटनेचे कार्य खऱ्या अर्थाने इतर संघटना व लोकांसाठी प्रेरणादायी ठरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यांचे हे कार्य लिखित दस्तावेजाच्या रूपात सर्वांसमोर आले पाहिजे. कॉफी टेबल बुक बनविले जावे. तो केवळ जैन समाजालाच नाही तर इतर समाजालाही प्रोत्साहित करेल व प्रेरणा देईल.

देण्याची वृत्ती असायला हवी

दर्डा म्हणाले, जेव्हा जेव्हा जैन शब्दाचा उल्लेख होतो, तेथे सेवेची गोष्ट केली जाते. जेव्हा सेवेची गोष्ट होते तेव्हा दान किंवा पैशाची गोष्ट केली जात नाही तर वृत्तीवर भर दिला जातो. वृत्ती अशी असावी जी सर्वस्व अर्पण करायला तयार होईल. लोकमतने नेहमीच अशा लोकांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयरमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित केले, ज्यांनी सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. ससून रुग्णालयाचे डॉ. रोहितदास बोडसे, कोल्हापूरचे जफरबाबा सैय्यद, मुंबई मनपाची एक महिला कर्मचारी, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईचे डॉ. सिधेश्वर बिराजदर किंवा नागपूरच्या डॉ. अल्का जातकर ज्यांनी २५० पेक्षा अधिक कोरोना संक्रमित गर्भवती महिलांची सुरक्षित प्रसूती केली. पद्मश्री डॉ. लहाने यांना सन्मानित केल्याचे त्यांनी सांगितले.

एमएमसीची परवानगी

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र मेडिकल काउंसिल (एमएमसी) चे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सध्याच्या काळात हेल्पलाईन वेळेची गरज असल्याचे सांगितले. ती अशावेळी सुरू होत आहे ज्यावेळी त्याची खरोखर गरज आहे. केसेस वाढत असल्याने मेडिकल स्टॉफवर तणाव वाढत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मेडिकल स्टॉफ कमी आहे. ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कमी लक्षणवाले किंवा लक्षण नसणारे आहेत. मात्र भीतीमुळे त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे. संपूर्ण हेल्थ केअर सेक्टरसाठी हे १४ महिने अत्यंत कठीण ठरले आहेत. तिसरी लाटही अतिशय कठीण राहणार आहे. आशा आहे की आपण सर्व विषाणूसोबत सुरू असलेले युद्ध जिंकू. काउंसिल व संघटन प्रत्येक मदतीसाठी तयार आहेत. कायद्यानुसार संघटन ऑनलाईन कंसल्टेशनसाठी अधिकृत नाही; पण काउंसिलची पूर्ण परवानगी राहील, असे ते म्हणाले.

तणाव वाढला आहे

डॉ. जयेश लेले यांनी यावेळी लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्ट केले. ते दूर करण्यात हेल्पलाईन महत्त्वाची ठरेल. रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. त्यांना दिलासा मिळेल. तिसऱ्या लाटेशी निपटण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. लोकांना मार्गदर्शन मिळेल.

योजना अमलात आणणे महत्त्वाचे

सुरेश मुथा म्हणाले, जेव्हा आपण एखाद्या समस्येने ग्रसित असतो, तेव्हा आपला मेंदू त्या समस्येचे समाधान शोधण्यासाठी प्रयत्न करीत असतो. विचार करणे व ते मिळविणे या वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र महत्त्वाचे आहे विचारांना अमलात आणणे. भविष्यात आणखी जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. हा उपक्रम काळाची गरज आहे. या संकटकाळी लोकांची मदत करणे व त्यांना मार्गदर्शन करणे महत्त्वाचे कार्य आहे.

११ लाखांच्या मदतीची घोषणा

कार्यक्रमादरम्यान जितो अपेक्सचे चेअरमन गणपतराज चौधरी म्हणाले, हेल्पलाईन काळाची गरज आहे. याद्वारे मेडिकल स्टॉफ व इंफ्रास्ट्रक्चरवर वाढलेला तणाव कमी करण्यास मदत होईल. डॉक्टरांच्या मदतीसाठी आयएमएच्या सहकार्याने हा पुढाकार घेतला जात आहे. यासाठी ११ लाख रुपयांची मदतराशी देण्याची घोषणा करण्यात आली.