शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

किती ही रडारड... जरा दोन क्षण हसा!

By admin | Updated: May 3, 2015 02:02 IST

जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आहे.

मंगेश व्यवहारे नागपूरजगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आहे. परंतु तो बघण्याची दृष्टी या रोजच्या तणावाने पार गमावून टाकली आहे. हसायला कुणाला आवडत नाही? पण इथे वेळ कोणाकडे आहे? चार क्षण निवांत मिळतील तर शपथ. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सारखा धावत असतो माणूस. अशा स्थितीत हसायचे म्हटले तरी लोकांच्या जीवावर येते. काही लोकं हसतातही पण रडवेल्या चेहऱ्याने. काय राव...! सुखांच्या मागे धावताना कितीही रडारड? घ्या विसावा एखाद्या वळणावर अन् हसून बघा मनसोक्त. हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो आणि मनाचे आरोग्यही उत्तम राहते. काय म्हणताय... हसायचे कुठे? अहो, आपल्या नागपुरात एक-दोन नव्हे तब्बल ३२ उद्यानांमध्ये वाटला जातो हा निखळ हास्याचा अमृतमय प्रसाद. एक जुनी म्हण आहे, आनंदी राहिल्याने आणि खूप हसल्याने, आजार दूर पळतात. देशात जवळपास १०००० वर लाफ्टर क्लब याचे प्रमाण आहेत. खरं पाहता अगदी लहान मूल दिवसात स्वत:शीच ३०० ते ४०० वेळा हसत असतं, आनंदी रहाणं हा त्याचा स्वभावधर्म असतो. ते मोठं होऊन जसजसा जगाचा अनुभव घेऊ लागतं. साठी गाठलेले सदस्य अधिक नागपूर : तसंतसं गांभीर्य, स्वयंनियंत्रण, जबाबदारी, भीती, असुरक्षितता यांच्या दडपणाखाली त्याचं हास्य आटू लागत. नेहमीच्या जीवनातले ताणतणाव चिंता यांनी ते मोठं होऊन हसायचं विसरते. परिणामी अनेक रोग त्याला घेरू लागतात. त्यापासून दूर राहण्याचा उपाय म्हणजे खळखळून हसणे. पण एखादा माणूस स्वत:शीच हसतोय असं दृश्य कोणी पाहिलं तर ते त्याला वेडा म्हणतील. त्याला खरोखरच वेड लागू नये असं वाटत असेल तर त्यानं हसलं पाहिजे. नागपुरात पहाटे ३२ उद्यानांमध्ये हास्याचे फवारे अनुभवायला मिळतात. ही मंडळी लाफ्टर क्लबचे सदस्य आहेत. यात मोठ्या संख्येने साठी गाठलेले नागरिक आहेत. रोज एक तास हसल्याने तणाव नियंत्रित राहतो असा त्यांचा अनुभव आहे.