शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

कोरोनाबाधित मृत्यूसंख्येचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

नागपूर : ‘कोविड-१९’ विषाणूमध्ये ‘ङबल म्युटेशन’ झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक ...

नागपूर : ‘कोविड-१९’ विषाणूमध्ये ‘ङबल म्युटेशन’ झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. परंतु म्युटेशनमुळे रुग्ण व मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसात ते दिसूनही येत असल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी ४७ रुग्णांचे जीव गेले. या वर्षातील ही सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. यात ३,५७९ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,०७,०६७ झाली असून, मृतांची संख्या ४,७८४ वर पोहचली आहे.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांसोबतच ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाबाधितांच्या विषाणूची जनुकीय संरचनेचा शोध घेण्यासाठी म्हणजे ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करण्यासाठी दिल्ली व पुण्याच्या प्रयोगशाळेत मेयोच्या प्रयोगशाळेने २०० नमुने पाठविले होते. परंतु याचा अहवाल प्रसिद्ध न करता महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे ‘ङबल म्युटेशन’ झाले एवढेच सांगितले जात आहे. यामुळे कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनेला अजूनही फारसे गंभीरतेने घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी १६,०६४ चाचण्या झाल्या. यात १२,५५३ आरटीपीसीआर तर ३,५११ अँटिजेन चाचणीचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ३,४७० तर अँटिजेनमधून १०९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णवाढीचा दर हा १.७२ टक्के असून, मृत्यूचा दर २.३१ टक्के आहे. गुरुवारी चाचण्यांच्या तुलनेत २२.२७ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले.

- शहरात २,५९७, ग्रामीणमध्ये ९७८ रुग्णांची नोंद

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील २,५९७, ग्रामीणमधील ९७८ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३३, ग्रामीणमधील १० तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील बाधितांची संख्या १,६४,२४९ झाली असून, मृतांची संख्या ३,०६५ झाली. ग्रामीणमध्येही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत ४१,८०३ रुग्ण व ८८६ रुग्णांचे जीव गेले.

-कोरोनावर मात करणाऱ्यांच्या दरात १४ टक्क्याने घट

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दर हा ९४ टक्के होता. आता यात १४ टक्क्याने घट होऊन ८०.८७ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी २,२८५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,६७,४६४ झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येने धाकधूकही वाढविली आहे. ३४,८१९ रुग्ण नागपूर जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह असून, यातील ८,०५९ रुग्ण विविध रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये आहेत. २६,७६० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

कोरोनाची स्थिती

दैनिक चाचण्या : १६,०६४

एकूण बाधित रुग्ण :२,०७,०६७

सक्रिय रुग्ण : ३४,८१९

बरे झालेले रुग्ण :१,६७,४६४

एकूण मृत्यू : ४,७८४