खापा : चाेरट्याने घरफाेडी करीत आत ठेवलेली गवत कापण्याची मशीन, गृहाेपयाेगी साहित्य, धान्य असा एकूण १४ हजार रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना खापा (ता. सावनेर) परिसरात मंगळवारी (दि. १३) मध्यरात्री घडली असून, बुधवारी (दि. १४) सकाळी उघडकीस आली.
यशवंत सदाशिव काेंबाडे (६३, रा. कुकडे ले-आऊट, नागपूर) यांची खापा शहरालगत शेती असून, शेतात घर आहे. त्या घरात कुणीही नसताना चाेरट्याने दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील १२ हजार रुपये किमतीचे ग्रास कटर (गवत कापण्याची मशीन) व दाेन हजार रुपयाची गृहाेपयाेगी भांडी, धान्य व कागदपत्र ठेवलेली बॅग असा १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच यशवंत काेंबाडे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार विजय बारई करीत आहेत.