शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

उत्पादन वाढीसाठी स्वदेशीवर भर

By admin | Updated: December 6, 2014 02:45 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास कुणाचाच विरोध नाही. परंतु कृषी क्षेत्रात होणारे संशोधन हे स्वदेशी असावे.

नागपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास कुणाचाच विरोध नाही. परंतु कृषी क्षेत्रात होणारे संशोधन हे स्वदेशी असावे. देशातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातूनच ते विकसित करण्यावर अधिक भर दिला जावा, असा सूर देशभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. सध्या जगभारत नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात आहेत. दररोज नवनवी यंत्रसामग्री येत आहे. भारतातही काही प्रमाणावर त्याचा वापर होतो आहे, परंतु या यंत्रसामग्रीचा वापर करावा किंवा नाही, यावर वाद सुरू आहेत. यावर चर्चा व्हावी, आणि यातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काही ठोस मार्ग निघावा, या उद्देशाने रेशीमबाग मैदानावर आयोजित ‘अ‍ॅग्रोव्हिजन-२०१४’ मध्ये शुक्रवारी ‘आधुनिक यंत्रसामग्रीतून कृषी उत्पादन वाढ आणि पर्यावरणाचा संबंध’ या विषयावर देशातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात शेती व पर्यावरणावर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे खरंच हित होत असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्री वापरण्याबाबत सर्वांनीच सहमती दर्शविली. परंतु आपल्याच देशातील संशोधकांनी संशोधन केल्यास ते येथील शेतकरी व एकूण परिस्थिती लक्षात घेऊन केले असेल. तसेच त्यातून खर्च कमी येईल. तेव्हा स्वदेशी संशोधनावर भर देण्यात यावा. यासाठी शासनाने संशोधनासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करावी, असेही सांगण्यात आले. केंद्रीय वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या चर्चासत्रात आयसीएआर (सिड्स)चे डेप्युटी डायरेक्टर जनरल डॉ. स्वरुप दत्ता, स्वदेशी जागरण मंचचे अश्विनी महाजन, नॅशनल ब्युरो आॅफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसचे डायरेक्टर डॉ. के.सी. बंसल, भारतीय किसान संघाचे सचिव प्रभाकर केळकर, फाऊंडेशन फॉर बायोटेक्नोलॉजी अव्हर्नेस अ‍ॅण्ड एज्युकेशन प्रो. सी. कामेश्वर राव, विजन्ना भारतीचे जनरल सेक्रेटरी जयकुमार, पंजाब विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. आय.एस. दुआ, कॉटन इन्स्टिट्यूट आॅफ कॉटन रिसर्चचे संचालक डॉ. के.आर. क्रांती, भारतीय किसान समाजचे डॉ. क्रिष्णबीर चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बायोटेक्नोलॉजी अ‍ॅण्ड बायोकेमेस्ट्री विभागाचे विभागप्रमुख डॉ. मानवेंद्र काचोरे, मायकोचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र बारवाले, रासी सीडस् प्रा.लि.चे डॉ. अरविंद कपूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रिशनचे डॉ. बी. दिनेशकुमार, महाराष्ट्र कृषी विभागाचे जॉर्इंट डायरेक्टर व्ही.एन. घवाते प्रामुख्याने सहभागी झाले होते. डॉ. सी.डी. मायी यांनी प्रास्ताविक सादर केले. बायोस्प्रेक्ट्रमचे ग्रुप एडिटर नारायणन सुरेश यांनी ओळख करून दिली. आयोजन समितीचे रवी बोरटकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)