शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

शेतकरी ४ टक्के व्याजदर पीककर्जापासून वंचित

By admin | Updated: May 15, 2015 02:41 IST

शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदराने पीककर्ज देण्यात येत असल्याचा दावा नाबार्ड आणि राज्य सहकारी बँका या आघाडीच्या ...

सोपान पांढरीपांडे  नागपूर शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदराने पीककर्ज देण्यात येत असल्याचा दावा नाबार्ड आणि राज्य सहकारी बँका या आघाडीच्या शासकीय संस्था करीत असल्या तरी, देशातील शेतकऱ्यांना या सुलभ व्याजदरात कर्ज मिळत नसल्याची खरी बाब पुढे आली आहे.तीनस्तरीय कर्ज वितरण यंत्रणाकेंद्राच्या निर्देशानंतरही शेतकऱ्यांना या सुलभ व्याजदरात कर्ज अजूनही मिळत नाही. राज्य शासनाची तीनस्तरीय कर्ज वितरण यंत्रणा ही शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळण्यास अडसर ठरत आहे. या यंत्रणेत नाबार्ड, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँका आणि अखेरची म्हणजे तालुकास्तरीय सेवा सहकारी सोसायट्यांचा समावेश आहे. नाबार्ड राज्य सहकारी बँकेकडून ४ टक्के व्याजदर आकारत असले तरीही या तिन्ही संस्थांतर्फे प्रत्येक स्तरावर १ ते १.५ टक्के अधिक व्याजदराची आकारणी करण्यात येत असल्याने अखेर शेतकऱ्यांना पीककर्जावर ७ ते ७.५० टक्के व्याज द्यावे लागते. डॉ. स्वामीनाथन यांचा अहवालब्रिटिश शासकांनी १९ व्या शतकात ४ टक्के व्याजदरात पीककर्ज देण्याची प्रथा सुरू केली होती. यूपीए सरकारने २००४ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात स्थापन केलेल्या आयोगाचे अध्यक्ष कृषी तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांनीही शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदरात पीककर्ज देण्याची शिफारस केली होती. डॉ. स्वामीनाथन यांनी देशातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक सूचनांचे पाच विस्तृत अहवाल शासनाकडे सादर केले होते. कमी कालावधीच्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांवर आकारण्यात येणाऱ्या कर्जाचा वार्षिक व्याजदर ९ ते १० टक्क्यांपेक्षा कमी असावा, ही या अहवालातील महत्त्वाची शिफारस होती. डॉ. स्वामीनाथन यांची शिफारस केंद्र सरकारने मान्य करून पीककर्जावर ४ टक्के व्याजदर आकारण्याचे निर्देश दिले होते. मध्य प्रदेशात शून्य टक्के व्याजदरअन्य देशात शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजदराचा विचार केल्यास चीनमध्ये शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरात पीककर्ज देण्यात येते. भारतातही शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी वेळोवेळी केली जाते. पण, ती केवळ मागणीच राहिली आहे. दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी लागू केलेली शून्य टक्के व्याजदराची योजना यशस्वीरीत्या सुरू आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरात ३५ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज मिळण्याची नितांत गरज आहे. हे घडल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि कृषीचा वार्षिक विकास दर चार टक्क्यांपेक्षा जास्त राहील, हे नक्की. कमी व्याजदराची कथा कल्पकशेतकऱ्यांना चार टक्के व्याजदरात पीककर्ज देत असल्याचा सरकार आणि नाबार्डचा दावा आहे. ही बाब सत्य आहे की, वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार व्याजदरात दोन टक्के आणि राज्य सरकार एक टक्के सवलत देते. तसे पाहता ७ ते ७.५ टक्के व्याजदराने पीककर्ज मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. कर्जाची परतफेड वेळेत केल्यास व्याजदरात तीन टक्के सवलत मिळते. डॉ. स्वामीनाथन यांच्या शिफारशीनंतरच पीककर्जावर चार टक्के व्याजदराची आकारणी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खरी बाब ही आहे की, निसर्गाच्या लहरीपणामुळे देशातील कोणताही शेतकरी कर्जाची परतफेड वेळेत करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पीककर्जावर आकारण्यात येणारे चार टक्के व्याजदर, ही केवळ कल्पक कथा आहे.