शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

राखमिश्रित कोळशामुळे पर्यावरणाची हानी

By admin | Updated: January 23, 2015 02:36 IST

वीज निर्मितीसाठी राखमिश्रित कोळसा वापरण्यात येत असल्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे.

नागपूर : वीज निर्मितीसाठी राखमिश्रित कोळसा वापरण्यात येत असल्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. यावरून राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाला कडक शब्दांत फटकारले आहे.यासंदर्भात महादुला येथील सामजिक कार्यकर्ते रत्नदीप रंगारी यांनी लवादात अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर व तज्ज्ञ सदस्य डॉ. अजय देशपांडे यांनी अर्जावर सुनावणी केल्यानंतर शासनाला फटकारतानाच विविध महत्त्वाचे आदेशही दिले आहेत. त्यानुसार खाणीतून काढल्यानंतर कोळशाचा दर्जा कसा असतो, वाहतुकीदरम्यान कोळसा बदलविण्यात येतो काय आणि या गैरव्यवहारासाठी कुणावर जबाबदारी निश्चित करता येईल, यासंदर्भात शासनाला २० फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करायचा आहे. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कार्य करावे. तसेच, खाणीतून कोळसा निघाल्यानंतर त्याची गुणवत्ता विविध ठिकाणी कशी बदलते किंवा खाणीमधूनच दर्जाहीन कोळसा काढला जातो काय याची चौकशी करावी, असे लवादाने सांगितले आहे. खाणीमधून कोळसा काढण्यासाठी, कोळसा वाहतुकीसाठी, कंपन्यांना कोळसा देताना आणि उद्योग व वीज कंपन्यांकडून कोळसा वापरण्यापूर्वी कोणत्या प्रकारची गुणवत्ता नियंत्रण प्रणाली वापरली जाते याची माहिती द्यावी, अशी सूचना करून वीज निर्मिती प्रकल्पांत दर्जाहीन कोळसा वापरला जातोय यासाठी वाहतूकदार, वीज कंपन्या किंवा अन्य संस्था यापैकी कुणाला जबाबदार धरता येईल याचे उत्तर लवादाने मागितले आहे. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने २ जानेवारी २०१४ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार वीज निर्मितीसाठी ३४ टक्क्यांपेक्षा जास्त राख असलेला कोळसा वापरण्यास बंदी आहे. परंतु, या नियमाची कुणीच काटेकोर अंमलबजावणी करीत नाही. वीज व कोळसा कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे. पर्यावरण व वन मंत्रालयाने निष्क्रिय भूमिका स्वीकारली आहे, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. महानिर्मिती कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. आवश्यक असल्यास व्यवस्थापकीय संचालक व मुख्य अभियंता यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात यावा, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावरही विविध आरोप आहेत. (प्रतिनिधी)