शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कैद्याच्या संशयास्पद मृत्यूने वाद

By admin | Updated: January 20, 2016 03:54 IST

मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या अनुराग ऊर्फ विनोद राजकुमार खन्ना (वय ३४) नामक कैद्याच्या संशयास्पद

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या अनुराग ऊर्फ विनोद राजकुमार खन्ना (वय ३४) नामक कैद्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. त्याचा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप लावून कुटुंबीयांनी याप्रकरणी कारागृह प्रशासनाला दोषी धरले आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने घातपाताचा इन्कार केला आहे. बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथील कन्नमवार वॉर्डातील रहिवासी असलेल्या अनुरागवर अपहरण, लुटमारीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे तो मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त (कैदी क्रमांक ६४०/१६) होता. त्याला सोमवारी रात्रीपासून मळमळ, जळजळ होऊ लागली. अ‍ॅसिडिटीचा त्रास असावा म्हणून मध्यवर्ती कारागृहातील इस्पितळाच्या कर्मचाऱ्यांनी अनुरागवर प्राथमिक उपचार केले. रात्री ११.३० च्या सुमारास त्याची प्रकृती ढासळल्यामुळे डॉ. तिवारी यांच्या सल्ल्यावरून त्याला कारागृह रक्षक राजेश महादेव डोईफोडे (वय ३३) यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला ११.५५ ला मृत घोषित केले. दरम्यान, अनुरागच्या मृत्यूची सूचना कुटुंबीयांना मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास देण्यात आली. त्यामुळे कुटुंबीय धावत-पळत नागपुरात पोहोचले. त्यांनी अनुरागची हत्या करण्यात आल्याचा आक्रोश करीत कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप लावले. खन्ना कुुटुंबीय आणि त्यांचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येत मेडिकलमध्ये पोहोचले. त्यांनी अनुरागची हत्या झाल्याचे सांगून जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत तेथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अर्चना भोयर आणि अन्य काही सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवून विविध गंभीर आरोप केल्यामुळे मेडिकल परिसरात तणाव निर्माण झाला. तो लक्षात घेता धंतोली पोलिसांनी तहसीलदारांना (तालुका दंडाधिकारी) पत्र देऊन इन्क्वेस्टला उपस्थित राहण्याची विनंती केली. कैद्याचा आतमध्ये घात ?४काही कुख्यात गुंड आतमधील नव्या आणि कच्च्या कैद्यांना (न्यायाधीन बंदी) छळतात. त्यांच्याकडून मालिश करून घेण्यासारखी व्यक्तिगत कामे करवून घेतात. नकार दिल्यास शत्रूसारखी वागणूक देतात, जबर मारहाणही करतात. दोन वर्षांपूर्वी एका कच्च्या कैद्याला अशाच प्रकारे बरॅकीतच काही कैद्यांनी गळा आवळून ठार मारले होते. त्यामुळे अनुरागसोबतही असाच काही घात झाला काय, अशी शंका उपस्थित झाली आहे. कारागृह प्रशासन त्या अँगलनेही चौकशी करीत आहे.