वीजनिर्मिती प्रकल्पासाठी मनपा शहरातून कचरा संकलित करून देणार होती, सोबतच प्रति टन २२५ रुपये देण्याची योजना होती. परंतु प्रकल्पाच्या लेटलतिफीतून रक्कम लुटण्याच्या योजनेला विराम मिळाला. निर्माण होणारी वीज सामान्य वीजनिर्मितीच्या तुलनेत दोन ते अडीच पट अधिक महाग असल्याची चर्चा होती. करारानुसार निर्माण होणारी वीज पारडी उपकेंद्राला देण्याची योजना होती. ती कागदावरच राहिली.
....
गाजावाजा करण्यासाठी फिल्म बनविली
कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रचार करण्याची मनपाने कोणतीही कसर सोडली नाही. १६ जुलै २०१८ विविध योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. यात कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचा समावेश होता. यावरील फिल्म बनविण्यावर मनपाने लाखो रुपये खर्च केले.
......
आता कचऱ्यापासून खतनिर्मिती
कचऱ्यापासून वीजनिर्मितीची योजना तयार करण्यात आली होती. प्रकल्प रखडल्याने यात बराच कालावधी गेला. दरम्यान स्वच्छ भारत अभियानात कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प आला. यामुळे वीजनिर्मितीचा प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेश दुफारे यांनी दिली.