सावनेर : काेराेनाचे वाढते संक्रमण राेखण्यासाठी प्रशासनातर्फे नागरिकांना लसीकरणासाठी प्राेत्साहित केले जात आहे. लसीकरण जनजागृती करण्यासाठी सावनेर तहसील कार्यालयाच्यावतीने सर्व लसीकरण केंद्र तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतमधील लसीकरण केंद्रात १७ हजार मास्कचे माेफत वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार सतीश मासाळ यांच्या हस्ते गाेरगरीब नागरिकांना मास्क वितरित करण्यात आले. तालुका प्रशासनाच्या आवाहनानुसार मानव सहानी मिशन यांनी १० हजार मास्क, स्टेट बॅंक शाखा सावनेर यांनी तीन हजार मास्क तसेच उद्याेजक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्येकी दाेन हजार मास्क असे एकूण १७ हजार मास्क गाेळा झाले. हे सर्व मास्क गरजूंना वितरित करण्यात आले. काेविड तपासणी केंद्र आणि ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक असलेल्यांना मास्क देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, उपविभागीय पाेलीस अधिकारी अशाेक सरंबळकर, तहसीलदार सतीश मासाळ व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते.
तहसील कार्यालयातर्फे १७ हजार मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:12 IST