शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यंत्र असतानाही बालरुग्ण वंचित

By admin | Updated: October 28, 2016 02:55 IST

हृदयरोग हा सर्वव्यापी जागतिक आजार आहे. या विकाराच्या निदानाची आवश्यक उपकरणे बहुसंख्य शासकीय रुग्णालयांत उपलब्ध आहेत.

मेडिकल : आणखी एक ‘माझी’ प्रकरणनागपूर : हृदयरोग हा सर्वव्यापी जागतिक आजार आहे. या विकाराच्या निदानाची आवश्यक उपकरणे बहुसंख्य शासकीय रुग्णालयांत उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) हृदयाचे स्पंदन टिपून चित्रीकरण करणारे ‘इको कार्डिओग्राफी’ यंत्र चालू स्थितीत आहे. परंतु याचा वापर केवळ औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉक्टरच करतात, बालरोग विभागाचे डॉक्टर थेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे पाठवितात. परिणामी, मेरसू बारसागडेसारख्या विवश बापाला आपल्या मुलाला पाठीवर बसवून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठावे लागत असल्याचे वास्तव आहे. गडचिरोली येथे राहणारे मेरसू बारसागडे यांचा आठ वर्षांचा मुलगा आनंद बारसागडे मेडिकलच्या वॉर्ड क्र. ६ मध्ये उपचार घेत आहे. किडनीसोबतच हृदयविकाराचीही समस्या समोर आल्याने त्याला मंगळवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘इको’साठी पाठविले. परंतु तिथे घेऊन जाण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही. यामुळे आनंदला पाठीवर बसवून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व तिथून परत पाठीवर बसवून मेडिकलमध्ये यावे लागले. या वृत्ताला ‘लोकमत’ने वाचा फोडताच खळबळ उडाली. काही वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, मेडिकलच्या अतिदक्षता विभागात ‘इको कार्डिओग्राफी’ यंत्र आहे. मेडिसीनच्या डॉक्टरांनी याचे प्रशिक्षण घेतल्याने ते या यंत्राचा वापर करतात. मात्र, बालरोग तज्ज्ञांना याचे प्रशिक्षण प्राप्त नसल्याने ते ‘सुपर’मध्ये पाठवितात. या तज्ज्ञांनाही प्रशिक्षण मिळाल्यास ‘सुपर’वरील भारही काही प्रमाणात कमी होईल. रुग्णांनाही सोयीचे ठरेल. (प्रतिनिधी) रुग्णांच्या मदतीसाठी पाच अ‍ॅम्ब्युलन्स रुग्णांच्या मदतीसाठी मेडिकलमध्ये तीन तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे दोन अ‍ॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) आहेत. परंतु त्यानंतरही मेरसू बारसागडेसारख्या अनेक विवश नातेवाईकावर पायपीट करण्याची किंवा पैसा खर्च करण्याची वेळ येते. यामागील कारणांचा शोध घेतला असता वॉर्डातील बहुतांश डॉक्टर याची माहिती रुग्णांना देत नसल्याचे समोर आले. रुग्णवाहिका उपलब्ध असल्याची माहिती दिली तरी ती वेळेवर मिळेल का, चालक उपस्थित राहील का याचा नेम राहत नाही. या संदर्भातील फलकही लावण्यात आले नाहीत. रुग्णवाहिकेतून रुग्णाला घेऊन गेले तरी त्याला स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर ठेवण्यासाठी तत्काळ अटेंडंट मिळत नाही. बराच वेळ वाट पाहण्यात जात असल्याचे दिसून आले.