तंत्रनिकेतन प्रवेशप्रक्रिया : केवळ ६० टक्के अर्जच दाखलनागपूर : अभियांत्रिकीप्रमाणे यंदा तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या जागा गेल्या वर्षीप्रमाणे अधिक प्रमाणात रिक्त राहणार, अशी चिन्हे आहेत. मंगळवारी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांसाठी अर्ज दाखल करणे व निश्चित करण्याची अखेरची तारीख होती. परंतु अखेरच्या दिवशीपर्यंत उपलब्ध जागांपैकी केवळ ६० टक्केच अर्ज आले. रिक्त जागांची संख्या कमी व्हावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करावे यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतन प्रवेशप्रक्रियेंतर्गत अर्ज दाखल करण्याची मुदत १४ जुलैपर्यंत वाढवली आहे. संध्याकाळी उशिरा यासंदर्भात संकेतस्थळावर माहिती देण्यात आली.२७ जूनपासून पॉलिटेक्निकच्या ‘आॅनलाईन’ प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. नागपूर विभागातील सर्व ७१ पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण २४,६५५ जागा उपलब्ध आहेत. अगोदरच्या वेळापत्रकानुसार अखेरच्या दिवसापर्यंत ५४ ‘एआरसी’वर (अप्लिकेशन रिसिप्ट सेंटर) १४, ६८० अर्ज आले व याची टक्केवारी काढली असता ती अवघी ५९.५४ टक्के इतकीच आहे. यातीलही अनेक विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा विभागात ७ ते १० हजार जागा रिक्त राहतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे.महाविद्यालयांत यंदा जास्त प्रमाणात जागा शिल्लक राहण्याची चिन्हे पाहून तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज विकत घेणे, दाखल करणे व निश्चित करणे या प्रक्रियेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांंना काही कारणांमुळे अर्ज दाखल करता आलेला नाही त्यांना संधी मिळावी याकरिता ही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)आज लागणार अभियांत्रिकीची अंतिम यादीदरम्यान, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेंतर्गत अंतिम प्रवेश यादी बुधवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. नागपूर विभागात जवळपास ७० टक्केच अर्ज दाखल झाले होते. ५ जुलै रोजी तात्पुरती प्रवेश यादी जाहीर करण्यात आली होती.महाविद्यालयांच्या चिंतेत वाढअगोदरच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. नागपूर विभागात अभियांत्रिकीची ७१ महाविद्यालये आहे. यातील काही मोजक्या महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता पसंती देण्यात येते. इतर महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यातच इतक्या कमी प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने रिक्त जागा भरायच्या कशा, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर आहे.सुधारित वेळापत्रकअर्ज सादरीकरण व निश्चिती १४ जुलैपर्यंततात्पुरती गुणवत्ता यादी १५ जुलैअंतिम गुणवत्ता यादी १८ जुलै
तारीख पे तारीख
By admin | Updated: July 9, 2014 01:03 IST