शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

दररोज १८ जणांच्या नशिबी बेवारस मरण!

By admin | Updated: November 6, 2014 02:47 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही केवळ ओळख पटत नसल्याच्या एकमात्र कारणामुळे राज्यात दररोज ...

नागपूर : माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही केवळ ओळख पटत नसल्याच्या एकमात्र कारणामुळे राज्यात दररोज सरासरी १८ जणांच्या नशिबी बेवारस मरण येत आहे. शासकीय यंत्रणांच्या उदासिनतेमुळे मृतदेह बेवारस राहत असून, बेवारस मृतदेह म्हणूनच त्यांना मूठमाती दिली जात आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर महानगरपालिका आणि स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण राज्यात २००९ मध्ये ६,८९५, २०१० मध्ये ७,६५१, २०११ मध्ये ६,३१३ आणि २०१२ मध्ये ५,९०६ एवढे बेवारस मृतदेह आढळून आले होते. गेल्या चार वर्षांत २६ हजार ७६५ जणांचा बेवारस मृत्यू झाला असून सरासरी दररोज १८ जणांच्या नशिबी बेवारस मरण येत आहे. नागपूरची २०१० ची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार नागपूर ग्रामीण भागात ६९, नागपूर रेल्वेच्या हद्दीत ५८० आणि नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४५२ मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आले होते. नागपूर महानगरपालिकेकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या त्रोटक माहितीनुसार २००८-०९ या काळात ३०१, २००९-१० या काळात ४७८ आणि २०१०-११ या काळात ५८१ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अखेरच्या दोन वर्षांची आकडेवाडी अंकेक्षणामुळे तूर्त उपलब्ध नसल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. मृतदेहांचा वाली पोलिसचधार्मिकस्थळांच्या आश्रयाने, रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि शासकीय इस्पितळांचे आवार, पुलांच्या खाली, शहर बसथांब्याच्या शेडमध्ये, रस्त्याच्या कडेला शेकडो लोक बेवारस जीवन जगत आहेत. काहींचा अपघाती, काहींचा दुर्धर आजाराने तर काहींचा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू होतो. काही स्वत:हून जीवनाला कंटाळून आत्महत्या करतात. या मृतदेहांचा एकमात्र वाली पोलीस कर्मचारी असतो. ओळख पटत नाही म्हणून मृतदेह बेवारस असतात. अशा मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु ते अपुरे ठरतात. मृतदेहाबाबत संपूर्ण वर्णन असलेला पंचनामा त्यांना करावा लागतो. भविष्यात मृतदेहाची ओळख पटावी म्हणून छायाचित्रेही घेतली जातात. ओळख पटावी म्हणून मृतदेहाच्या माहितीसह ‘टेलिग्राम मॅसेज’ प्रसारित केल्या जातो. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांकडे हा संदेश पाठविला जातो. मृतदेह शवागारात ठेवल्यानंतर संदेश जारी केल्यापासून ७२ तासांत ओळख पटली नाही तर अशा मृतदेहांचा कायद्यानुसार विल्हेवाटीचा अधिकार पोलिसांना प्राप्त होऊन ते उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहाला मूठमाती देतात. कुजलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते. पुढेमागे मृत व्यक्तीचे नातेवाईक आल्यास आणि त्यांनी मृतदेहाच्या ताब्याचा दावा केल्यास ‘कोरोनर्स अ‍ॅक्ट १९८८’ नुसार पुरलेला मृतदेह बाहेर काढून संबंधित नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार जिल्हा दंडाधिकाऱ्याला आहे. मृतदेहाचा अनादर होतो गुन्हाह्युमन ट्रान्सप्लान्ट अ‍ॅक्ट १९९४ नुसार इस्पितळ प्राधिकारी ४८ तासात ओळख न पटलेल्या मृतदेहाचे अवयव काढण्याची परवानगी देऊ शकतात. संबंधित मृताची ओळख पटण्याची शक्यता असल्यास आणि नातेवाईक यावर आक्षेप घेऊ शकतात, असे वाटल्यास इस्पितळ प्राधिकारी अवयव काढून घेण्याची परवानगी नाकारू शकतो. मृतदेहाचा कोणत्याही प्रकारे अनादर किंवा अवहेलना झाल्यास संबंधितांवर भादंविच्या २७९ कलमान्वये कारवाई केली जाऊ शकते. यात एक वर्ष कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. आधार कार्डचा फायदा काय ? कोणत्याही ठिकाणी बेवारस स्थितीत मृत झालेली व्यक्ती ही निश्चितच कुठली ना कुठली रहिवासी आणि कुणाची तरी नातेवाईक असते. ‘आधार कार्ड’ काढताना संबंधित व्यक्तीचे ‘फिंगर प्रिंटस्’ आणि चेहरेपट्टी घेतली जाते. पोलिसांकडूनही बऱ्याच प्रसंगात फिंगर प्रिंटस् घेतले जातात.या फिंगर प्रिंटद्वारे बेवारस मृतदेहाची ओळख पटविली जाऊ शकते. प्रसार माध्यमांचीही यासाठी मदत घेतली जाऊ शकते.