शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना सव्वाकोटीने चुना - ज्वेलर्स महिलेला जामीन

By admin | Updated: August 29, 2014 01:00 IST

तब्बल २९४ ग्राहकांची १ कोटी २५ लाख रुपयांनी लुबाडणूक करणाऱ्या एका ज्वेलर्स महिलेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.

नागपूर : तब्बल २९४ ग्राहकांची १ कोटी २५ लाख रुपयांनी लुबाडणूक करणाऱ्या एका ज्वेलर्स महिलेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. उषा यज्ञेश्वर टेटे (५५) असे या महिलेचे नाव असून, ती सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुजीनगर आयुर्वेदिक ले-आऊट येथील रहिवासी आहे. गुन्ह्याच्या प्रथम खबरी अहवालानुसार, या महिलेचे आयुर्वेदिक ले-आऊट येथे दुर्गा अलंकार ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या महिलेविरुद्ध पहिली तक्रार नरसाळा येथील रहिवासी राजपाल ईश्वरराव वैद्य यांनी २ एप्रिल २०१४ रोजी सक्करदरा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यावरून या महिलेविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०९, ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी तिला अटक करण्यात आली होती. पुढे या महिलेविरुद्ध तक्रारींचा ओघ वाढत गेला. २९४ ग्राहकांनी तिच्याविरुद्ध तक्रारी नोंदविल्या. त्यांची एकूण फसवणुकीची रक्कम १ कोटी २५ लाख रुपये आहे. राजपाल वैद्य यांनी २२ एप्रिल २०१३ रोजी उषा टेटे हिला १५ ग्रॅम सोन्याचा गोफ बनविण्यासाठी दिला होता. यासाठी त्यांनी स्वत:जवळील १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ आणि ३,५०० रुपये रोख दिले होते. वारंवार दागिन्याची मागणी करूनही तिने गोफ बनवून दिला नाही आणि ३६ हजार ७४० रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, अन्य ग्राहकांनी दागिने आणि पैसे परत मागण्यासाठी तिच्या घरावर गर्दी केली होती.या महिलेने कुणाचे गहाण ठेवलेले दागिने तर कुणाचे बनविण्यास दिलेले दागिने हडप केले होते. अटक झाल्यापासून ही महिला कारागृहातच होती. तिच्याकडून मुंबई आणि बांद्रा येथील मालमत्तेच्या आममुख्त्यारपत्राचे दस्तऐवज, अमरावती येथील शेती खरेदीबाबत कागदपत्रे, बीएमडब्ल्यू कार आदी जप्त करण्यात आले आहे. तिच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. या महिलेने न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अशोक भांगडे, अ‍ॅड. मिलिंद देवगडे, अ‍ॅड. वैभव जगतात आणि अ‍ॅड. दीपाली दियेवार यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)