नागपूर: व्यावसायिक शिक्षण घेऊनही चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळत नाही. टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. यामुळे तरुणांमध्ये नैराश्यता वाढत चालली आहे. मात्र, तरुणांना नैराश्यातून बाहेर काढत मोठ्या कंपनीमध्ये रोजगार मिळवून देण्याचे काम ‘सीटीपीएल’ ही संस्था गत दहा वर्षांपासून करीत आहे, असे ‘सीटीपीएल’चे संचालक सुहास शिंदे यांनी सांगितले.
‘सीटीपीएल’ संस्थेचा दहावा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी ‘सीटीपीएल’चे संचालक सुहास शिंदे, स्नेहल शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुहास शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी व्यवसायिक शिक्षणाची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याला जोड अभ्यासक्रम शिकण्यापेक्षा कंपनीमधून अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. आयटी क्षेत्रातील कंपन्यांची गरज ओळखून त्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना अनुभवी सॉप्टवेअर अभियंते तयार करून देते. मागील दहा वर्षांपासून कंपनीने विशेषत: विदर्भातील शेकडो मुलांना रोजगार मिळवून दिला आहे. स्नेहल शिंदे म्हणाल्या, अनुभव आणि प्रात्यक्षिक ज्ञान देणारी व्यवस्थाच उभी नसल्याने विद्यार्थी मागे पडतात. ‘सीटीपीएल’ विद्यार्थ्यांना कुशल कौशल्य देण्याचे काम करीत आहे. या तीन महिन्यांमध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा या भागातील ३० विद्यार्थ्यांची जागतिक दर्जाच्या कंपनींमध्ये निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.